मुख्यमंत्री भाजपचाच होणार : मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:59 AM2019-06-11T01:59:21+5:302019-06-11T01:59:50+5:30

: भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑात भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य दिल्लीतील एका बैठकीत केल्यानंतर त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या गोटात नाराजी असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील ‘अबकी बार २२० के पार’ असे म्हणत मुख्यमंत्री भाजपचाच होईल, अशी ठाम भूमिका नाशिकमध्ये मांडली.

 Chief Minister will be the BJP's candidate: Mungantiwar | मुख्यमंत्री भाजपचाच होणार : मुनगंटीवार

मुख्यमंत्री भाजपचाच होणार : मुनगंटीवार

Next

नाशिक : भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑात भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य दिल्लीतील एका बैठकीत केल्यानंतर त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या गोटात नाराजी असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील ‘अबकी बार २२० के पार’ असे म्हणत मुख्यमंत्री भाजपचाच होईल, अशी ठाम भूमिका नाशिकमध्ये मांडली. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने आपली नाराजी कुठेही स्पष्टपणे मांडली नसल्याने आम्ही आता ‘साथ-साथ आहोत’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. आता महाराष्टÑात निवडणुका होऊ घातल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत बैठक झाली.  त्यावेळी शहा यांनी महाराष्टÑात भाजपाचाच मुख्यमंत्री हवा, असे व्यक्तव्य केल्याने मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा बाळगून असलेल्या शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा दाखला देत मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असल्याचे सूचक विधान केले.
शिवसेनेने उघडपणे कुठेही नाराजी व्यक्त केलेली नसल्याने आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभेतही सोबत आहोत. शिवसेनेचे उमेदवार जेथे असतील ते निवडणून आणण्याची जबाबदारी भाजपाची असेल, असे आदेश शहा यांनीही दिले आहेत. युतीतील मित्रपक्षांचेही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे युतीत कोणताही बेबनाव नाही. सेना आणि भाजपा साथ-साथ असून ‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार’ याप्रमाणे उभयतांची भूमिका असल्याचा पुनरुच्चारही मुनगंटीवर यांनी केला.
अद्याप जागावाटप झालेले नाही, बैठकीत चर्चेतून काही निर्णय होतील. लोकसभेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जागांमुळे जनतेच्या भावना लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकही तितकीच गांभीर्याने आणि ‘अब की बार २२० के पार’ याच न्यायाने लढल्या जातील, असेही मुनगंटीवार म्हणाले.भाजपा-सेनेची मैत्री पक्की असल्याने नाराजी कुठेही नाही. शिवसेनेनेदेखील नाराजी जाहीर केलेली नाही. आगामी विधानसभा निवडणूक युतीतील पक्ष मोठ्या ताकदीने लढतील.
काका-पुतण्यामध्ये एकमत होण्याच्या दिल्या शुभेच्छा
राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला, तर अजित पवार यांनी काही ठिकाणी राष्टÑवादीचेही उमेदवार निवडून आल्याचे राष्टÑवादीच्या मेळाव्यात विधान केल्याने काका-पुतण्यांमधील विसंवाद पुन्हा समोर आला. याविषयी मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी काका-पुतण्यांमध्ये एकमत होवो, अशा राष्ट्रवादीला शुभेच्छा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Web Title:  Chief Minister will be the BJP's candidate: Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.