मुख्यमंत्री शिवसेनेचाच, फलकबाजीने तापले वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:15 AM2019-07-17T01:15:22+5:302019-07-17T01:16:03+5:30

राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, असे या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑ प्रभारी सरोज पांडे यांनी जाहीर करून चोवीस तास उलटत नाही तोच शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या मुख्यालयासमोरच फलकबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा टोला लगवण्यात आला.

Chief Minister Shivsena's, ambient atmosphere | मुख्यमंत्री शिवसेनेचाच, फलकबाजीने तापले वातावरण

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, फलकबाजीने तापले वातावरण

Next
ठळक मुद्देभाजपा नाराज : हा बालीशपणा असल्याची बाळासाहेब सानप यांची टीका

नाशिक : राज्यात भाजपाचाचमुख्यमंत्री होणार, असे या पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑ प्रभारी सरोज पांडे यांनी जाहीर करून चोवीस तास उलटत नाही तोच शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या मुख्यालयासमोरच फलकबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा टोला लगवण्यात आला. मंगळवारी (दि.१६) हा प्रकार उघड झाल्यानंतर संंबंधित नगरसेविकेने फलक काढून घेतला असला तरी त्यातून उभय पक्षात धुसफूस वाढली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी हा निव्वळ बालीशपणा असल्याची टीका केली आहे, तर शिवसेनेच्या नेत्यांनी मौन बाळगले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यात सोमवारी (दि.१५) नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजपाच्या महाराष्टÑ प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांच्या विधानाची भर पडली. दोन्ही पक्षांची युती असली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेने कल्पना विलास सोडावा अशी कोपरखळी त्यांनी मारली. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच मंगळवारी (दि.१६) भल्या सकाळीच शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी वसंत स्मृती तसेच या ठिकाणी एन.डी. पटेलरोडवर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे फलक लावून भाजपाला खिजवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने हे फलक काढून घेण्यात आले तरी या फलकबाजीने वादात भर पडली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे, एवढीच प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केली, तर भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी हा बालीशपणा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सेना नेत्यांचे हात वर
सदर फलकबाजी संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी हात वर करीत यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, मनपा विरोधी पक्षनेते
अजय बोरस्ते यांनी
यासंदर्भात प्रतिक्रिया देण्याचेही टाळले.

Web Title: Chief Minister Shivsena's, ambient atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.