नाशकात घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, शिवजन्मोत्सवाचा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:53 PM2018-02-19T17:53:59+5:302018-02-19T19:47:22+5:30

'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजार्पयत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.

Chhatrapati Shivaji Maharaj's jubilee celebrates Shivajnmotsav's world record | नाशकात घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, शिवजन्मोत्सवाचा विश्वविक्रम

नाशकात घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, शिवजन्मोत्सवाचा विश्वविक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देनाशकातून शिवजन्मोत्सव पालखीची मिरवणूकशहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष शिवभक्तांनी धरला पारंपारिक वाद्यावर ठेका

नाशिक : 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या गगणभेदी गजर्नेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजाच्या जयघोषाने सोमवारी (दि.19) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजार्पयत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्य़ात सहभागी पारंपारिक वाद्यांच्या तालावर विविध लोककलांच्या सादरीकरणासोबत लेझिम पथक आणि मिरवणुकीत शिवभक्तांनीही ठेका धरला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी शिववंदना व जिजाऊ वंदना करण्यात आली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आयोजकांना एक लाख नागरिकांच्या सहभागासह जिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे ग्रामीण अध्यक्ष आमदार अपुर्व हिरे, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे शहर अध्यक्ष सुनील बागुल, आमदार सीमा हिरे, छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर गगणभेगी तुताऱ्यांच्या निनादांसह ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली.

मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा संत तुकाराम महाराज यांच्यासोबतचा संवाद दाखवणारा चित्ररथ, त्यानंत राजमाता जिजाऊ बाल शिवाजींना स्वराडज्य स्थापनेचे धडे देतानाचे दर्शन घडविणाऱ्यां चित्ररथासोबतच संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्ररथांचाही मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता. शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभागी होत ढोल ताशाच्या तालावर लेझीमनृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करून काही घोडेस्वारांनीही मिरवणुकीत सहभागी होत शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. अशोक स्तंभावरून पुढे रविवार कारंजावर पोहचल्यानंतर मिरवणुकीत पोहचल्यानंतर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्य़ास अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांना पंचामृताने अभिषेक करण्यात आल्यानंतर पालखी सोहळ्य़ाची सांगता झाली. पंचवटी कारंजा येथील सोहळ्य़ाचे सूत्रसंचालन तूषार जगताप यांनी केले.

पालकमंंत्र्यांनीही धरला ठेका 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नाशिकचे पालकमत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांनीही ढोल ताशाच्या तालावर ठेका धरीत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला 



सीबीएस, मालेगाव स्टँण्ड येथे मानवंदना
शिवजन्मोत्सव सोहळ्य़ात सहभागी शिवभक्तांनी सीबीएस तसेच मालेगाव स्टॅँडवरील अश्वारुढ पुतळ्य़ाला मानवंदना दिली. येथे पालखी सोहळ्य़ातील आदिवाशी कला पथकांनी विविध कलाविष्कार सादर केले.यावेळी महिलांनीही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.

 

छत्रपती बहूजनांचे कैवारी
बहूजनांच्या रक्षणासाठी शहाजी राजे व राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून छत्रपती संभाजी महाराजांनीही हाच वसा कायम राखला. त्यामुळेच छत्रपती अवघ्या बहूजनांचे कैवारी असल्याचे शिवजन्मोत्सवाच्या प्रारंभी बोलताना सई वाकचौरे, हर्षदा बनकर, मयुरी पिंगळे, वैष्णवी ठाकरे, मुग्धा थोरात या पंचकन्यांनी सांगितले. तर गायत्री पनमहाले हिने छत्रपती शिवीजी महाराजांवरील पोवाडा सादर केला.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj's jubilee celebrates Shivajnmotsav's world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.