जाहिरातीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:48 AM2018-06-13T00:48:43+5:302018-06-13T00:48:43+5:30

गुगलद्वारे हॉटेलची जाहिरात करतो असे सांगून नागपूरच्या संशयिताने हॉटेल व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करून हजारो रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ अंशुमन ठाकूर (रा. नागपूर) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर भद्रकाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 Cheating by advertising bait | जाहिरातीचे आमिष दाखवून फसवणूक

जाहिरातीचे आमिष दाखवून फसवणूक

googlenewsNext

नाशिक : गुगलद्वारे हॉटेलची जाहिरात करतो असे सांगून नागपूरच्या संशयिताने हॉटेल व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करून हजारो रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ अंशुमन ठाकूर (रा. नागपूर) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर भद्रकाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  चंद्रभान यादव (रा़ रजत पार्क , डीजीपीनगर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १४ डिसेंबर २०१७ रोजी संशयित ठाकूर याने शालिमार येथील हॉटेल न्यू हॉलिडे प्लाझाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला़ तसेच वन क्लिक आॅनलाइन कंपनी प्रा़ लिमिटेडचा मी मॅनेजर असून, तुमच्या हॉटेलची गुगलद्वारे जाहिरात करतो असे सांगून विश्वास संपादन केला़ यानंतर हॉटेल व्यवस्थापनाकडून जाहिरातीसाठी ३६ हजार १८८ रुपये घेतले़ मात्र हॉटेलची कोणतीही जाहिरात न करता फसवणूक केली़
पंचवटीत महिला  भाविकेच्या पर्सची चोरी
मुंबईहून पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास सरदार चौकातील सांडव्यावरच्या देवी मंदिर परिसरात घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पवईच्या लेक होम्स येथील रहिवासी कल्पना दिलीप रामधरणे (५३) या नाशिकला देवदर्शनासाठी आल्या होत्या़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गोदाघाटावरील सांडव्यावरच्या देवी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांची पर्स चोरून नेली़ या पर्समध्ये पंधरा हजार रुपये रोख व वीस हजार रुपयांचे सोन्यात बनविलेले हिºयाचे गंठण, वाहन परवाना असा ३५ हजार रुपयांचा ऐवज होता़
मागील भांडणाची  कुरापत काढून शस्त्राने वार
मागील भांडणाची कुरापत काढून एका युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि़ ९) मध्यरात्रीच्या सुमारास जुने नाशिकमधील जाकिर हुसेन हॉस्पिटलजवळ घडली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा नाक्यावरील महालक्ष्मी चाळीतील रहिवासी प्रताप किसन चव्हाण यांच्यावर संशयित शंकर रोशन कल्याणी (३९, महालक्ष्मी चाळ, वडाळानाका) याने मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला़ यानंतर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच मानेवर धारदार वस्तूने वार करून जखमी केले़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जाचक मळ्यात घरफोडी करून चोरट्यांनी पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे़ सचिन सातारकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ८ ते ९ जून या कालावधीत चोरट्यांनी घरफोडी करून तीन तोळे सोन्याची पोत व दीड तोळे सोन्याचा नेकलेस असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला़ या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
परदेशी खुनातील संशयितांना पोलीस कोठडी
म्हसरूळ बोरगडमधील एकतानगर येथे नितीन परदेशी या युवकाच्या डोक्यात गोळी मारून खून करण्यात आल्याची घटना घडली़ या खून प्रकरणात संशयित मयूर राजाराम जाधव (२२, रा. श्री एकतानगर सोसायटी, एकतानगर, बोरगड), हितेश ऊर्फ चिक्कू रवींद्र केदार (वय २३, रा. वेदांत, चाणक्यपुरी सोसायटी, म्हसरूळ-मखमलाबादरोड), विजयकुमार ऊर्फ मुन्ना पुंडलिक गांगोडे (वय २३, रा. वेदश्री, चाणक्यपुरी सोसायटी, म्हसरूळ-मखमलाबादरोड) या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली़ या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि़१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, या खुनाचे कारण तसेच गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा अद्याप पोलिसांना मिळालेला नसून त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़

Web Title:  Cheating by advertising bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.