Chapli! | भीड चेपली !
भीड चेपली !

ठळक मुद्देपोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत आहेसामान्य नागरिकास कायद्याचा हिसका दाखवून जेरीस आणणारी यंत्रणा स्वत:वरील हल्ल्यांबाबत स्वस्थ का असते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कौटुंबिक वादातून नाते-संबंधात होणारे किंवा व्यवसायादिकारणातून मित्रांमध्ये घडून येणारे वाद व हल्ले अलीकडे वाढले आहेतच; परंतु सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांवर आणि अगदी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार वरचेवर घडून येत असल्याने यंत्रणांचा धाक ओसरत चालल्याचे स्पष्ट व्हावे.
मनमाड येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीचा पाठलाग करून त्यास जेरबंद करू पाहणाºया एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या सहकारी पोलिसावर संबंधिताने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे, तर नाशकात अतिक्रमण हटाव पथकात सेवा बजावत असताना वडाळा नाका परिसरात तीन पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली गेली आहे. या अगदी काल-परवातील दोन घटनांचा उल्लेख येथे केला असला तरी, यापूर्वीच्या अशा घटनांची बेरीज थोडी थोडकी नाही. नाशकात गेल्या सहा महिन्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या दोन डझन एवढ्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागात व विशेषत: मालेगावच्या गिरणा काठी अवैध वाळू उपसा करणारे लोक महसुली कर्मचाºयांच्या अंगावर सरळ सरळ गाड्या घालत असल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात, तसे नाशकात वाहतूक नियंत्रित करणाºया पोलिसाला कानशिलात लगावून अनेकदा बेशिस्त रिक्षाचालक बेगुमानपणे पसार होत असतात. कायदा हातात घेण्याबद्दलची भीतीच उरली नसल्याने हे प्रकार वाढत आहेत. एरव्ही सामान्य नागरिकास कायद्याचा हिसका दाखवून जेरीस आणणारी यंत्रणा अशी स्वत:वरील हल्ल्यांबाबत स्वस्थ का असते, असा प्रश्न यातून उपस्थित व्हावा. यंत्रणेचा धाक ओसरल्याचे तर यातून दिसून येतेच; पण महत्त्वाचे म्हणजे तीत काम करणाºया नोकरदारांच्या मनोधैर्यावरही त्याचा परिणाम झाल्याखेरीज राहात नाही. तेव्हा सार्वजनिक स्वरूपात दहशत निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे नाशिकरोडच्या नेहरूनगरमधील वाहने पेटवून देण्याचे प्रकार असोत, की सरकारी यंत्रणेत कर्तव्य बजावणाºयांवर हात उगारण्याचे; त्याबद्दल संबंधिताना हिसका दाखवणेच आवश्यक आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच तातडीचे ठरावे.


 


Web Title: Chapli!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.