चांदवडला महालक्ष्मी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:48 PM2019-04-15T17:48:51+5:302019-04-15T17:49:10+5:30

चांदवड - येथील गुजराथ गल्लीतील दसा श्रीमाली गुजराथी पंच ट्रस्टचे श्री महालक्ष्मी माता मंदिर १९ सा व्या शतकातील कै.नथुसा लखुसा गुजराथी यांनी बांधले असून या मंदिराचा जिणोध्दार नुकताच करण्यात आला.

Chandwadla Mahalaxmi Mata Murti Pranaprishtha Souza | चांदवडला महालक्ष्मी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

चांदवडला महालक्ष्मी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

Next

चांदवड - येथील गुजराथ गल्लीतील दसा श्रीमाली गुजराथी पंच ट्रस्टचे श्री महालक्ष्मी माता मंदिर १९ सा व्या शतकातील कै.नथुसा लखुसा गुजराथी यांनी बांधले असून या मंदिराचा जिणोध्दार नुकताच करण्यात आला.
श्री. महालक्ष्मी माता मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पौरोहित्य अमोल दिक्षीत व त्यांचे सहकारी यांनी केले . महालक्ष्मी माता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सुभाषभाई हरकलाल गुजराथी (नाशिक ), सौ. प्रतिभा व प्रकाशभाई हरकलाल गुजराथी ( पुणे) यांच्या हस्ते होऊन कळसपुजन चित्राबेन व मिलींद गुजराथी सिन्नर यांच्या वतीने शुंभागी व राजेंद्र श्रीमाळी इंदौर यांच्या हस्ते झाले. कळसरोहण विधी कोकमठाण येथील जनार्दन स्वामी चे शिष्य मंहत अमरगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.यानंतर सौ. रेखास्मृती सभागृहाचे उद्घाटन नाशिकचे डॉ. डी.एम. गुजराथी यांच्या हस्ते झाल. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष प्रसाद गुजराथी होते तर प्रास्ताविक नवनीत गुजराथी यांनी तर सूत्रसंचालन मनोज गुजराथी यांनी केले. यावेळी डॉ. डी.एम. गुजराथी, प्रकाश गुजराथी (पुणे) , योगेश गुजराथी (कल्याण),सुरेंद्र गुजराथी, प्रा. प्रतिभा गुजराथी (पुणे) , विजय गुजराथी प्रा.चंद्रकांत जामदार यांची भाषणे झाली.

Web Title: Chandwadla Mahalaxmi Mata Murti Pranaprishtha Souza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.