चलन पुरवठ्याने  टंचाईचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:18 AM2018-04-21T01:18:56+5:302018-04-21T01:18:56+5:30

संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या झळा नाशिकरांनाही सहन कराव्या लागत असून, जवळपास आठवडाभरापासून जाणवत असलेले चलनटंचाईचे आणखी गडद होत असताना गुरुवारी रात्री बँकांना चलनपुरवठा झाल्याने शुक्रवारी (दि.२०) दुपारनंतर परिस्थिती काहीशी सुधारणा दिसून आली.

Challenges of shortage of money supply deficit | चलन पुरवठ्याने  टंचाईचे संकट टळले

चलन पुरवठ्याने  टंचाईचे संकट टळले

Next

नाशिक : संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या झळा नाशिकरांनाही सहन कराव्या लागत असून, जवळपासआठवडाभरापासून जाणवत असलेले चलनटंचाईचे आणखी गडद होत असताना गुरुवारी रात्री बँकांना चलनपुरवठा झाल्याने शुक्रवारी (दि.२०) दुपारनंतर परिस्थिती काहीशी सुधारणा दिसून आली. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ८० ते ९० टक्के एटीएमसाठी रोख रक्कम उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील चलन टंचाईची समस्या बिकट बनली होती. परंतु, आता बँकांना चलन पुरवठा झाल्याने शहरातील चलनटंचाईचे संकट काहीकाळ का होऊन टळले आहे.सोशल मीडियावर नोटटंचाई आणि नोटबंदीविषयी वेगवेगळ्या चर्चा होत असल्याने नागरिकांच्या संभ्रमात वाढ होत असताना विविध बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार काही प्रमाणात चलनपुरवठा झाल्याने शहरातील चलनटंचाईच्या परिस्थिीत काही काही अंशी सुधारणा झाली.
अपुरा पुरवठा
जिल्ह्यातील एटीएम कें द्रांना जवळपास ३० कोटी, तर शहरात सुमारे ६० कोटी रुपयांची रोख रक्कमेची गरज भासते. परंतु त्या तुलनेत रक्कमेचा पुरवठा करणाऱ्या करन्सी चेस्ट व प्रमुख शासकीय बँकांकडेही रोकड कमी असल्याने एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध करून देण्यासाठीही नोटांचा पुरवठा अपुरा पडत आहे.

Web Title: Challenges of shortage of money supply deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.