‘सीईटी’च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:27 AM2018-04-23T00:27:15+5:302018-04-23T00:27:15+5:30

साईनाथनगर चौफुलीलगत असलेले महाराष्ट्राला सीईटी सेंटर आयओएने झोन येथे सीईटीच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांकडे मूळ ओळखपत्र नसल्याने सुमारे २५ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न दिल्याने त्यांचे नुकसान झाले सदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षेस बसविण्याची मागणीचे निवेदन दिले.

CET students are not allowed to sit for exams | ‘सीईटी’च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मनाई

‘सीईटी’च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मनाई

Next

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत असलेले महाराष्ट्राला सीईटी सेंटर आयओएने झोन येथे सीईटीच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांकडे मूळ ओळखपत्र नसल्याने सुमारे २५ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न दिल्याने त्यांचे नुकसान झाले सदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षेस बसविण्याची मागणीचे निवेदन दिले.  उत्तर महाराष्ट्राचे आयओएस झोन येथे सीईटीची परीक्षा असल्याने उत्तर महाराष्ट्रातून विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी आले होते, परंतु यातील सुमारे पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट होते, परंतु मूळ ओळखपत्र नसल्याने त्यांना परीक्षेत बसू दिले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले काहीकाळ या विद्यार्थ्यांनी परीक्षेत बसू द्यावे यासाठी गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले त्या विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य अमित पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना केंद्रावर बोलून घेतले त्यांनी व विद्यार्थ्यांनी परिषद केंद्र अधिकाºयांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान नाही होणार असे पाऊल उचलावे तसेच थम्ब मशीन ठेवावे, अशी मागणी केली. सदर निवेदनावर सोमेश्वर लांधी, श्वाश्वती पाटील, ललित देशमुख, वैष्णवी मोरे यांसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: CET students are not allowed to sit for exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा