कुंदलगाव शिवारात कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:53 PM2019-05-13T17:53:44+5:302019-05-13T17:54:49+5:30

चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मनमाड - मालेगाव रस्त्यावर धावती कार अचानक पेटून मोठे नुकसान झाले. कार पेटल्याचे समजताच प्रवाशी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

 Car took the car in Kundalgaon Shivar | कुंदलगाव शिवारात कारने घेतला पेट

कुंदलगाव शिवारात कारने घेतला पेट

Next

चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगावकडून मनमाडकडे जाणारी कार (एमएच १९/ एवाय २७७७) अचानक पेटल्याने कारमधील रहिम अहमंद (३६, रा. चिंचेचा मळा, मालेगाव) यांच्यासह अन्य पाच जण खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला. मनमाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कार पूर्णपणे खाक झाली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. या आगीमुळे मनमाड - मालेगाव रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. चांदवड पोलिसांनी आकस्मिक आगीची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title:  Car took the car in Kundalgaon Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.