कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा  ; ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ला तूर्त स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:50 AM2018-09-22T00:50:04+5:302018-09-22T00:51:14+5:30

चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील ‘पे अ‍ॅण्ड पार्क’च्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तूर्त ‘पे अ‍ॅण्ड पार्किंग’ला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी बोर्डाच्या आगामी बैठकीत निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 Cantonment Board Front; Suspension for 'Pay and Park' immediately | कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा  ; ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ला तूर्त स्थगिती

कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा  ; ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ला तूर्त स्थगिती

Next

देवळाली कॅम्प : चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील ‘पे अ‍ॅण्ड पार्क’च्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तूर्त ‘पे अ‍ॅण्ड पार्किंग’ला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी बोर्डाच्या आगामी बैठकीत निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  कॅन्टोन्मेंट प्रशासनाने १६ सप्टेंबरपासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अ‍ॅन्ड पार्किंगचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी व्यापारी वर्गाने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला पार्किंगबाबत निवेदन देऊन ‘पे अ‍ॅन्ड पार्किंग’ बंद करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी या पार्किंगच्या विरोधात शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर व्यापाºयांनी मोर्चा काढून बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व व्यापाºयांनी अजय कुमार यांच्याशी चर्चा केली. पार्किंग योजना कशी अव्यवहारी आहे याविषयी माहिती देऊन व्यापाºयांना विश्वासात न घेता त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, आगामी सण-उत्सव लक्षात घेता याबाबत तातडीने फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पे अ‍ॅण्ड पार्कला तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा निर्णय हा संपूर्ण बोर्डाचा असल्यामुळे त्यात फेरबदल करायचे असल्यास बोर्डाच्या सभेतच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले.  मात्र व्यापाºयांनीदेखील आपल्याकडे येणाºया ग्राहकांना वाहन पार्किंगविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी रतन चावला, प्रकाश केवलानी, उत्तम टाकळकर, संजय गोडसे, हनुमंता देवकर, सादिक कॉन्ट्रॅक्टर, मंगेश गुप्ता, गौतम गजरे, जगदीश गोडसे, सुरेश कदम आदी उपस्थित होते.
शहराला शिस्त लागण्यासाठी निर्णय
शहराला शिस्त लागावी, शहर सुंदर व स्वच्छ असावे बाहेरून येणाºया नागरिकांना देवळाली विषया आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात वाढणारी वाहतूक व वाहन संख्या लक्षात घेता पार्किंगचे नियोजन आजच करणे गरजेचे आहे असल्याचे ते म्हणाले. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’बाबत बोर्डाच्या अंतिम बैठकीत लोकप्रतिनिधींसह व्यापाºयांच्या प्रतिनिधींनाही पाचारण केले जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले.

Web Title:  Cantonment Board Front; Suspension for 'Pay and Park' immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.