नाशिकमधून पुण्याकडे जाणाºया बसेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:42 AM2018-01-03T00:42:24+5:302018-01-03T00:43:59+5:30

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाºया सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Cancellation of buses from Nashik to Pune | नाशिकमधून पुण्याकडे जाणाºया बसेस रद्द

नाशिकमधून पुण्याकडे जाणाºया बसेस रद्द

Next
ठळक मुद्देएस.टी. महामंडळ : चार बसेसचे नुकसान सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद शहरासह राज्यभर उमटल्याने पुणे येथील तणाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून पुण्याकडे जाणाºया सर्व शिवशाही बसेस रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात चार ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरातील प्रवासी बसेसही काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. नाशिकरोड, सारडा सर्कल आणि वडाळा नाका या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पुणे येथील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या तणावानंतर बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथून निघणाºया बसेस थांबविण्यात आल्या तर नाशिकहून निघणाºया बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. जेलरोड येथे दोन तर नाशिकरोड, वडाळा नाका,
कॅनडा कॉर्नर परिसरात बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले. पुण्यात तणाव निर्माण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, औरंगाबाद, धुळे आणि नाशिकमध्येही घटनेचे लोण पसल्याने अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या शहरांमध्ये जाणाºया सर्व प्रकारच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. तर अनेक बसेस या आहे त्या ठिकाणी थांबविण्यात येऊन खबरदारी घेण्यात आली.
नाशिकच्या ठक्कर बसस्थानक येथून निघणाºया शिवशाही बसेस पूर्णपणे थांबविण्यात आलेल्या असून धुळे, औरंगाबाद येथील बसेसही दुपारनंतर बंद करण्यात आल्या होत्या. महामार्ग येथून मुंबईकडे जाणाºया शिवशाही तसेच इतर बसेसही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. भुसावळ-अर्नाळा या बसवर वडाळा नाका येथे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे महामंडळाने शहरातील तसेच लांबपल्ल्याच्या बसफेºयांमध्ये कपात करून परिस्थितीनुसार बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.
नाशिकमधील तणावाची परिस्थिती पाहता शहरातून तुरळक बसेस सुरू होत्या. नांदूरमार्गे जाणाºया बसेस बंद करण्यात
आल्या होत्या. तर कॅम्पला जाणाºया बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. नाशिकरोडलाही तुरळक बसेस सुरू होत्या. सायंकाळनंतर वाहतूक पूर्वपदावर आली. अद्याप नुकसानीचा अंदाज नाहीशहरासह ग्रामीण भागातील काही बसेसवर तसेच लांबपल्ल्याच्या बसेसवरही दगडफेक करण्यात आल्यामुळे नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही. परंतु शहरातील काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. काही खासगी बसेसचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून काही बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मुंबई, पुणे कडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

Web Title: Cancellation of buses from Nashik to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.