कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन : आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:36 AM2018-11-13T01:36:15+5:302018-11-13T01:36:56+5:30

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

C. Madhavrao Gaikwad passed away: Today's funeral | कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन : आज अंत्यसंस्कार

कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन : आज अंत्यसंस्कार

googlenewsNext

मनमाड : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. श्रमिक, मजूर व कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आयुष्य वेचणारा ‘आपला माणूस’ गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई व मुलगी अ‍ॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १३) होणार आहे.  नगर जिल्हातील खंडकरी शेतकºयांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतकºयांचे नेते म्हणून बाबूजींना ओळखले जात. १९५७ ते १९६२च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. त्या वेळेस दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, साने गुरुजी, ना. ग. गोरे असे अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर होते. त्याच बरोबर डॉ. ए.बी. वर्धन, सुधाकर रेड्डी, डी.राजा यांच्या सारखे अनेक कम्युनिष्ट नेते त्यांना सहकारी म्हणून लाभले. नांदगाव तालुक्यातून अनेक निवडणुका लढविल्या; परंतु प्रवाहाच्या विरुद्ध राजकारणात असल्याने त्यांना अनेक निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. 
१९७४ ते १९८१ पर्यंत मनमाड शहराचे थेट नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. १९८४ मध्ये गायकवाड यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब विखे पाटील असल्याने ती निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची ठरली होती. त्यावेळी बीबीसी रेडीओने त्यांच्या उमेदवारीची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होेते. या वृत्तामुळे कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शेवटच्या दोन दिवसात प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत माधवराव गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. १९८५ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता. सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून विजयाची माळ गायकवाड यांच्या गळ्यात घातली होती. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना मंजूर करून आणल्या होत्या.
अल्प परिचय...
कॉ माधवराव गायकवाड यांचा जन्म १८ जुलै १९२४ रोजी मनमाड येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला.बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचे शिक्षण येथील छत्रे विद्यालयात झाले. परिसरात त्यांना बाबूजी म्हणून ओळखले जात.
राज्यातील खंडकरी शेतकर्यांचे ते नेते होते . शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारून शेतकºयांना न्याय मिळवून दिला.१९६० ते १९६२ पर्यंते ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर १९७४ साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक झाली.त्यात कॉ. गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. १९७४ ते १९८१ पर्यंत ते नगराध्यक्ष होते.१ सप्टेंबर १९७८ रोजी त्यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून निवड झाली. १९८५ साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.

 

Web Title: C. Madhavrao Gaikwad passed away: Today's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.