बसेस थांबत नाहीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको हिसवळ खुर्द : अनियमित बससेवेमुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:13 AM2017-12-30T00:13:05+5:302017-12-30T00:17:03+5:30

नांदगांव : बसेस थांबत नाहीत. वेळेवर येत नाहीत. या कारणास्तव नांदगाव-मनमाड रोडवरील हिसवळ खुर्द येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून अर्धा तास रास्ता रोको केला.

Buses do not stop students, stop the students' course: anger due to irregular bus services | बसेस थांबत नाहीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको हिसवळ खुर्द : अनियमित बससेवेमुळे संताप

बसेस थांबत नाहीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको हिसवळ खुर्द : अनियमित बससेवेमुळे संताप

googlenewsNext
ठळक मुद्दे२० दिवसातील ही तिसरी वेळबस तातडीने सोडण्यात आली.

नांदगांव : बसेस थांबत नाहीत. वेळेवर येत नाहीत. या कारणास्तव नांदगाव-मनमाड रोडवरील हिसवळ खुर्द येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून अर्धा तास रास्ता रोको केला.
विद्यार्थ्यांनी नांदगाव आगाराच्या बसच्या विरोधात रास्ता रोको करण्याची २० दिवसातील ही तिसरी वेळ आहे. दिवसेंदिवस बस विरोधातील आंदोलनाचे लोण वाढत चालले आहे. आज मनमाड बसचा वाहक विद्यार्थ्यांना घेत नाही अशी तक्रार होती, अशी माहिती नांदगाव आगाराचे विजय पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेऊन नांदगाव आगाराची बस तातडीने सोडण्यात आली. हिसवळ येथील विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता येणारी ब्राह्मणपाडे-नांदगाव व नाशिक-नांदगाव या बसेस अडवून रास्ता रोको केला.
पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
विद्यार्थ्यांच्या रास्ता रोकोप्रसंगी हिसवळ खुर्दचे विजय आहेर व पोलीस नायक पंकज देवकाते यांनी मध्यस्थी करु न विद्यार्थ्यांंची समजूत काढली व रास्ता रोको मागे घेण्यात आला. नांदगाव आगाराच्या बसेस वेळेवर सुटत नाही, बस रद्द होणे विद्यार्थ्यांना बसमध्ये अपमानाची वागणूक मिळणे या कारणास्तव विद्यार्थ्यांनी पिंप्राळे, नांदगाव व हिसवळ येथे तीन वेळा रास्ता रोको केला तरीदेखील समस्या सुटत नाही.

Web Title: Buses do not stop students, stop the students' course: anger due to irregular bus services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.