सोनसाखळी खेचून दुचाकीस्वारांचा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:16 AM2019-03-15T01:16:31+5:302019-03-15T01:17:36+5:30

श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातून सोन्याची साखळी खेचून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली.

Bunny | सोनसाखळी खेचून दुचाकीस्वारांचा पोबारा

सोनसाखळी खेचून दुचाकीस्वारांचा पोबारा

googlenewsNext

नाशिक : श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातून सोन्याची साखळी खेचून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली.
श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील चौरंग अपार्टमेंटमधील रहिवासी किशोर बाळकृष्ण जोशी (६५) हे बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाडांना पाणी देत असताना हा प्रकार घडला. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून ३० ते ३५ वयोगटांतील दोन तरुण इमारतीच्या आवारात आले. त्यातील दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले होते. त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जोशी यांच्याकडे येऊन त्यांच्या गळ्याला दुखापत करीत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरून नेली.

Web Title: Bunny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.