बीएसएनएलचे तोडले विज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 07:50 PM2019-07-10T19:50:00+5:302019-07-10T19:54:59+5:30

पाटोदा : विज वितरण कंपनीचे सुमारे साडेसात लाख रु पयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाटोदा येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद असून त्यामुळे नागरिकांना संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

BSNL's broken Vij connection | बीएसएनएलचे तोडले विज कनेक्शन

बीएसएनएलचे तोडले विज कनेक्शन

Next
ठळक मुद्देपाटोदा : पाच हजार मोबाईल धारकांचा संपर्क तुटलासाडेसात लाखाचे वीजिबल थकविल्याने विज पुरवठा तोडला

पाटोदा : विज वितरण कंपनीचे सुमारे साडेसात लाख रु पयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाटोदा येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद असून त्यामुळे नागरिकांना संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कनेक्टीव्हिटी नाही, त्यामुळे सर्व बँक व्यवहार तसेच आॅनलाइन सेवा बंद असल्याने नागरिक व जेष्ठ नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. आठ दिवस होऊनही बीएसएनएल कढून वीजबिल भरण्यासाठी पावले उचलली जात नसल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पाटोदा येथे बीएसएनएलचे कार्यालय असून येथील विज वितरण कंपनीकडून या कार्यालयाला विज पुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएलने सुमारे साडेसात लाखाचे बिल थकविल्याने व वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यास टाळाटाळ केल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत गेल्या आठ दिवसांपासून खंडीत केला. त्यामुळे या भागातील संपूर्ण दूरध्वनी तसेच मोबाईल सेवा बंद पडली आहे.
या भागात बँक आॅफ बडौदा ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असून सुमारे चाळीस हजार खातेदार या बँकेला परिसरातील सुमारे विस गावे जोडलेली आहेत. मात्र कनेक्टीव्हिटी उपलब्ध नसल्याने ग्राहकांचे गैरसाय होत आहे. तसेच सर्वच आॅनलाईन सेवा बंद असल्याने शासकीय दाखले काढणेसाठी विद्यार्थी व पालकांची मोठी धावपळ झाली आहे.

चौकट : गेल्या चार दिवसांपासून सुमारे पाच सहा किलोमीटर पायपीट करून मी पाटोदा येथे पैसे काढण्यासाठी चकरा मारत आहे. मात्र कनेक्टिव्हिटी नसल्याने निराशा होत आहे. बीएसएनएलने यातून मार्ग काढून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.
- सदाशिव जगताप
जेष्ठ नागरिक, ठाणगाव.

वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली असून बिल भरण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी लवकरच पाटोदा येथे भेट देऊन बिल भरण्यासाठी तडजोड करतील.
- पवार
मंडळ उपभियांता, बीएसएनएल, येवला.

गेल्या आठ दिवसांपासून विज पुरवठा खंडीत करण्यात आलेला असतांनाही बीएसएनएलकडून बिल भरण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. जेष्ठ नागरिकांना आपले शासकीय मानधन घेण्यासाठी चकरा माराव्या लागत आहे. येत्या दोन दिवसात बीएसएनएल येथील सेवा सुरळीत न केल्यास बीएसएनएल सेवेची अंतयात्रा काढणार आहे.
- उस्मान शेख, पाटोदा.

Web Title: BSNL's broken Vij connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.