निर्बीजीकरण पाच महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:37 AM2018-07-13T01:37:42+5:302018-07-13T01:39:26+5:30

नाशिक : शहरात अनारोग्याचा प्रश्न गंभीर तर आहेच परंतु मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना गेल्या १३ मार्चपासून श्वान निर्बीजीकरण बंद आहे. डुक्कर पकडण्याची मोहीम आठच दिवसांत स्थगित करण्यात आली. उघड्यावरील मांसविक्री बंदबाबत कोणतीही कारवाई नाही. या सर्व प्रकारांमुळे स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पशुवैद्यकीय अधिकाºयांना धारेवर धरले.

 Breakout for 5 months | निर्बीजीकरण पाच महिन्यांपासून बंद

निर्बीजीकरण पाच महिन्यांपासून बंद

Next
ठळक मुद्देस्थायी समितीत चर्चा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

नाशिक : शहरात अनारोग्याचा प्रश्न गंभीर तर आहेच परंतु मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना गेल्या १३ मार्चपासून श्वान निर्बीजीकरण बंद आहे. डुक्कर पकडण्याची मोहीम आठच दिवसांत स्थगित करण्यात आली. उघड्यावरील मांसविक्री बंदबाबत कोणतीही कारवाई नाही. या सर्व प्रकारांमुळे स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पशुवैद्यकीय अधिकाºयांना धारेवर धरले. शिवाय उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने डॉ. प्रमोद सोनवणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १२) पार पडली. यावेळी गेल्यावर्षी गेल्या सभेत श्वान निर्बीजीकरणाचा ठेका मंजूर करताना झालेल्या चर्चेच्या अनुषंघाने पशुवैद्यकीय अधिकाºयांना अनेक बाबींची माहिती मागवण्यात आली होती. मात्र पशुसंवर्धन विभाग दोन महिन्यांपूर्वीच अस्तित्वात आला असून, आपल्याकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने संपूर्ण माहिती देण्यास डॉ. सोनवणे यांनी असमर्थता व्यक्त केल्याने सदस्य अधिकच संतापले.
महापालिकेने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका दिल्यानंतर आत्तापर्यंत ७२ हजार ३०३ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आठ हजार ७६० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली. मात्र केंद्रशासनाच्या नियमावलीनुसार ७० टक्के मादी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होण्याची गरज असून, त्यानुसार कार्यवाही होत नसल्याबद्दल दिनकर पाटील, सुषमा पगारे आणि कोमल मेहरोलिया यांनी जाब विचारला. नागरिकांनी कुत्रे पकडण्यासाठी सूचना केल्यानंतर पथक घटनास्थळी गेल्यानंतर तेथे नर आणि मादी असे कुत्रे न बघता पकडले जातात, असे डॉ. सोनवणे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवकांचे समाधान झाले नाही. यावेळी विविध प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देताना डॉ. सोनवणे यांनी अगोदरच ठेक्याची मुदत संपल्याने १३ मार्चपासून निर्बीजीकरण बंद आहे. तसेच डुकरे पकडण्याची मोहीम आठ दिवस चालविण्यात आली. पुढील आदेशानंतर ती पुन्हा सुरू करता येईल, असे सांगितले. तर भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी उघड्यावरील मांसविक्री बंदीबाबत चर्चा करण्यात असल्याचे सांगितल्यानंतर सदस्य अधिकच संतप्त झाले.
निर्बीजीकरणाचे पुरावे काय?
श्वान निर्बीजीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी त्याचा पुरावा काय? असा प्रश्न संतोष साळवे यांनी केला, तर महापालिकेच्या कर्मचाºयांना कुत्रेच पकडता येत नसून आपण स्वत: कुत्रे पकडायला येतो, पण कुत्रे पकडून दाखवा, असे आव्हानच उद्धव निमसे यांनी दिले. उघड्यावरील मांसविक्रीचा मुद्दा समीर कांबळे यांनी उपस्थित केला, तर निर्बीजीकरणामुळेच कुत्रे सैरभैर होऊन चावा घेत असल्याचा दावा कोमल मेहरोलीया यांनी केला.

Web Title:  Breakout for 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.