धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:15 AM2019-05-19T01:15:33+5:302019-05-19T01:16:29+5:30

धनोली धरणाचे गेट तोडल्यामुळे पाटाद्वारे वाहू लागलेले पाणी. पाळे खुर्द : महाराष्टÑात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता ...

Break the gate of Dhanoli Dam and try water supply | धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देकळवण तालुक्यातील घटना  दळवटच्या चौघांना अटक; गुन्हा दाखल

धनोली धरणाचे गेट तोडल्यामुळे पाटाद्वारे वाहू लागलेले पाणी.
पाळे खुर्द : महाराष्टÑात दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याची घटना घडली असून, त्यामुळे धरणातील सुमारे सात ते आठ दशलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे. धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी लोक आता कोणत्या स्तराला चालले आहेत, याचे हे उदाहरण ठरावे. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. शेतकºयांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार इसम संशयास्पद स्थितीत आढळले. शेतकºयांनी संबंधित इसमांना पकडले आणि धनोली गावातील मंदिरात कोंडून ठेवले. या इसमांनी चौकशी केली असता ते चौघेही दळवट येथील रहिवासी असल्याचे समोर आले. ही बातमी पसरताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची कुणकुण प्रशासकीय यंत्रणेला लागताच संपूर्ण यंत्रणा धनोली गावात रात्री ९ वाजेच्या सुमारास हजर झाली. कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्यासह अभोणा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान धरणाचे गेट तोडणारे दळवट येथील प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५) आणि सुभाष येवाजी पवार (६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेतकºयांचे लाखोंचे नुकसान
या घटनेने आदिवासी शेतकरी अंबादास गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, सुखराम पवार, किसन वाघ, भास्कर दळवी यांसह अनेक शेतकºयांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सुमारे तीनशे क्विंटल कांदा वाहून गेला आहे. तसेच शेतात साठविलेला जवळपास दीडशे क्विंटल कांदा भिजला आहे. शेतात उभ्या असलेल्या मिरची, कोथिंबीर, उन्हाळी बाजरी व वालपापडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Break the gate of Dhanoli Dam and try water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.