दारूचा शौक भागविण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्याला दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:46 PM2019-02-21T17:46:54+5:302019-02-21T17:49:00+5:30

माणसामाणसांमधील संवदेना तर हरवूनच बसल्या आहेत मात्र नातेसंबंधातील ऋुणानुबंध आणि संवदेना संपुष्टात येत असल्याचे विविध घटनांवरून अनेकदा स्पष्ट होते.

The boy gave the father to him not to pay the fancy of liquor | दारूचा शौक भागविण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्याला दिला चोप

दारूचा शौक भागविण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्याला दिला चोप

googlenewsNext
ठळक मुद्देमातृपितृ देवो भव: ही संस्कृतीही तो विसरला जन्मदात्री मातेलाही शिव्यांची लाखोली

नाशिक : मातृपितृ देवो भव: अशी संस्कृती जोपासणाऱ्या राज्याच्या भूमीत दारुचा शौक भागविण्यासाठी पित्याने पैसे दिले नाही म्हणून त्या जन्मदात्या बापाला पोटचा गोळा म्हणविणाऱ्या मुलाने चक्क चोप दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मुलाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कलियुगात कधी काय घटना घडेल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. माणसामाणसांमधील संवदेना तर हरवूनच बसल्या आहेत मात्र नातेसंबंधातील ऋुणानुबंध आणि संवदेना संपुष्टात येत असल्याचे विविध घटनांवरून अनेकदा स्पष्ट होते. असाच काहीसा केविलवाणा व तितकाच लाजिरवाणा प्रकार शहरातील रविवार पेठेतील शनी गल्लीमध्ये घडला.
या भागातील रहिवासी रमेश नुनासे (६३) यांचा मुलगा शेखर याने दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला त्यांनी नकार दिला असता शेखरने चक्क जन्माला घालणाºया आपल्या पित्याला ‘मी तुम्हाला पाहून घेतो’ अशी धमकी देत लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दारू प्यायची म्हणून आई-वडिलांकडून पैशांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून या बेभान मुलाने समोर उभ्या असलेल्या पित्याला मारहाण केली यावरच तो थांबला नाही तर मातृपितृ देवो भव: ही संस्कृतीही तो विसरला आणि जन्मदात्री मातेलाही शिव्यांची लाखोली वाहिली, ही घटना तीतकीच संतापजनक आहे. त्यामुळे समाजाची वाटचाल नेमक्या कुठल्या दिशेने होत आहे, याचाच प्रत्यय या घटनेतून यावा.

 

Web Title: The boy gave the father to him not to pay the fancy of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.