पाणी तलावात टाकण्यात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:27 PM2018-01-21T22:27:00+5:302018-01-22T00:17:04+5:30

हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.

Bound in water pond | पाणी तलावात टाकण्यात अडसर

पाणी तलावात टाकण्यात अडसर

Next

वीरगाव : हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.  आरम व मोसम या दोन्हीही प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या व अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया वीरगाव परिसरातील आठ ते दहा गावांतील शेती सिंचनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरून नसल्याने येथील शेतीला वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गत दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत येथील शेतकरीवर्गाने एकत्र येत पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी अनेक कामे लोकसहभागाच्या जोरावर पूर्ण करून शेती सिंचनावर मात करण्यात काही अंशी यश मिळविले आहे. लोकसहभागाच्या जोरावर अनेक नाल्यांवर बांध घालून जमिनीत पाणी जिरविण्याचे काम शेतकरी वर्ग करीत असताना या नाल्यांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रवाह उपलब्ध होणे ही काळाची गरज असून, हरणबारीच्या पाण्यातूनच हे साध्य होणार आहे.
वीरगाव या गावापासून चार किमी अंतरावर ढोलबारे पाझर तलाव आहे. तलावाची साठवण क्षमता सुमारे १५ दलघफू एवढी आहे. या तलावाच्या उत्तरेस अवघ्या १.५ किमी अंतरावर हरणबारी धरणाचा उजवा कालवा वाहतो. या कालव्याद्वारे दरवर्षी हजारो क्यूसेस पूरपाणी वाहून जात असते. या पूरपाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून अनेक नाल्यांमध्ये हे पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला सोन्याचे दिवस आले आहेत.  एकीकडे ही परिस्थिती असताना अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावरील वीरगाव परिसरातील शेतीला मात्र लहरी पावसाच्या पाण्यावरच वर्षानुवर्ष अवलंबून राहावे लागत आहे. याचमुळे हरणबारी धरणाचे पूरपाणी तसेच आरक्षित पाण्याचा फायदा वीरगाव परिसरातील शेतीसाठीही व्हावा यासाठी येथील शेतकरीवर्ग गत सात ते आठ वर्षांपासून याप्रश्नी आवाज उठविताना दिसून येत आहे.  या कामातील अनेक तांत्रिक त्रुटी दूर सारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात दिवंगत आमदार ए. टी. पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ११६० दलघफू क्षमता असलेल्या हरणबारी धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  गत आठ ते दहा वर्षांपासून मोसम नदीवर बंधारे बांधण्यासाठी शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी झाल्यानंतर या बंधाºयांसाठी साल्हेर वळण योजना १ व २ अंतर्गत पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. याच उपलब्ध पाण्यातून ढोलबारे येथील पाझर तलावासाठीही पाणी आरक्षित करण्यात आले आहे.  कालवा खोदकाम मार्गातील शेतकरी वर्गाच्या हरकती दूर करण्यातही या भागातील जनतेला यश आले आहे; मात्र यानंतरही या कामास निधी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Bound in water pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.