खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:30 AM2019-01-01T02:30:28+5:302019-01-01T02:30:44+5:30

आम्ही डॉन आहोत असे सांगून ४० हजार रूपये खंडणीची मागणी करुन यंत्रमाग कारखानदाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेवून दमदाटी करणाºया दोन जणांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Both arrested and demanded ransom | खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

Next

मालेगाव : आम्ही डॉन आहोत असे सांगून ४० हजार रूपये खंडणीची मागणी करुन यंत्रमाग कारखानदाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेवून दमदाटी करणाºया दोन जणांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रशीदनगर भागातील ८० फुटी रस्त्यावर ही घटना घडली. मुद्दस्सीर हुसेन जुम्मनअली (३३) रा. अब्दूल्लानगर, ग. नं. २ या यंत्रमाग कारखानदाराने फिर्याद दिली. गुलाम ताहीर गुलाम रसूल (३५) रा. याकूब मशिदजवळ प्लॉट नं. १५, आणि माजिद हुसेन (३०) रा. बिस्मिल्लानगर, नवा पॉवर हाऊस या दोघांनी संगनमत करुन फिर्यादी मुद्दस्सीर हसन याला आम्ही येथील डॉन आहोत असे सांगून त्याचेकडून ४० हजार रूपयांची खंडणी मागितली.
८० हजारांचे मांस जप्त
मालेगाव : आझादनगर भागागातील बाग-ए-इसाक येथील मोनीस मशिदीजवळील मागच्या गल्लीत अ‍ॅटो रिक्षामध्ये ८० हजार रूपये किंमतीचे २०० किलो जनावरांचे मांस व अवयव बाळगणाºया नियाज अहमद शब्बीर अहमद (३०) रा. नयापुरा, ग. नं. २ याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Both arrested and demanded ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.