घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:42 AM2018-11-12T01:42:41+5:302018-11-12T01:43:03+5:30

मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी शनिवारी मुख्य संशयित आरोपी राकेश छगनलाल जैन (२९) रा. शांतीनगर, धुळे व निखिल प्रेमचंद पारस यांना तालुका पोलिसांनी शिताफीने धुळे व निंबायती येथून अटक केली.

Both the accused arrested in the sale of ghodegaon Shivar's Spirit | घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी दोघांना अटक

मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी अटक केलेल्या संशयितांसमवेत पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले व कर्मचारी.

Next

आझादनगर : मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी शनिवारी मुख्य संशयित आरोपी राकेश छगनलाल जैन (२९) रा. शांतीनगर, धुळे व निखिल प्रेमचंद पारस यांना तालुका पोलिसांनी शिताफीने धुळे व निंबायती येथून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
रविवारी (दि. ४) तालुक्यातील घोडेगाव शिवारात टँकरमधून स्पिरीट चोरी करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीस विशेष पोलीस पथकाने
छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोटी ४१
लाख ३८ हजार ५०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ए. बी. क्षीरसागर यांनी तालुका पोलिसांत
फिर्याद दिली होती. मुख्य संशयित फरार होते.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सहा. पोलीस निरीक्षक विशाल टकले व सहकाºयांनी शनिवारी राकेश छगनलाल जैन (२९) यास धुळे व निखिल प्रेमचंद पारस यास तालुक्यातील निंबायती येथून अटक केली. अधिक तपास सहायक
पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.

Web Title: Both the accused arrested in the sale of ghodegaon Shivar's Spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.