भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:55 AM2019-05-25T00:55:45+5:302019-05-25T00:55:58+5:30

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे.

 BJP's vote-by-polls: | भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी

भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी

Next

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे. हे मताधिक्य भाजप-सेना युतीला बळ देणारे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या छातीत कळ निघणारे आहे. राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका व त्यांचे पती संजय या दाम्पत्याने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र जनतेने कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना नाकारले. हा निकाल मात्र चव्हाण यांच्यासाठी धोक्याचा इशारा असून, त्यांचे कट्टर विरोध माजी आमदार दिलीप बोरसे यांच्यासाठी मात्र सुखद धक्का देणारा आहे.
बागलाणमध्ये गेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना २९ हजारांचे मताधिक्य होते. मात्र गेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत परिणामकारक ठरले नाही. गेल्या निवडणुकीत बागलाणचे प्रतिनिधित्व भाजपचे उमाजी बोरसे यांनी केले होते. मात्र अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका यांना आमदारकीची लॉटरी लागली आणि मोदी लाटेतही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण यांनी कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यातच माजी आमदार दिलीप बोरसे यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा घेतल्याने चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत डॉ. भामरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. सटाणा शहरासाठी केळझर पाणीपुरवठा योजना युतीच्या काळात मंजूर झाली. जलवाहिन्या खरेदी, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामे करण्यात आली. त्याचा फायदा युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत तर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांची कसोटी लागणार आहे.
तालुक्याच्या राजकीय समीकरणांकडे लक्ष
बागलाणमध्ये भाजपचे काँग्रेसीकरण झाल्याचे बघायला मिळत आहे. वास्तविक भाजपचे संघटन
हे दुबळे आहे. मात्र मोदी करिष्म्यामुळे ते झाकले जात आहे. असे असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे
उमेदवार दिलीप बोरसे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, तोच फॉर्म्युला
या लोकसभा निवडणुकीत डॉ.भामरे यांच्या बाबतीत विरोधकांनी
राबवल्याचे बघायला मिळाले. ऐन निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याचा प्रयत्न केला. काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात राहून काँग्रेसच्या उमेदवाराचे नियोजन केल्याचे सांगितले जाते. काहींनी यंत्रणा खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. अशा दगाबाजांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतात, यावरही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

Web Title:  BJP's vote-by-polls:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.