भाजपच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:11 AM2019-05-24T00:11:45+5:302019-05-24T00:24:28+5:30

जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

BJP's victory in the district's victory | भाजपच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

भाजपच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

Next

नाशिक : जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.  सकाळपासून दिंडोरी लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चौकाचौकात कार्यकर्ते गर्दी करून थांबलेले होते, तर अनेकजण घरात दूरदर्शन संचासमोर ठाण मांडून बसलेले होते. पहिली, दुसरी आणि तिसरी फेरी झाल्यानंतर भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याचे  स्पष्ट होताच तसेच संपूर्ण देशभरात भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त समजताच  भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दुपारी निकाल घोषित होण्यापूर्वीच पेढे, लाडू वाटप करून व फटाके फोडून नमोचा  नारा लगावत आनंदोत्सव साजरा केला.
एकीकडे भाजप-शिवसेना युतीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते, तर दुसरीकडे काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचल्याने अनेकांनी सोशल मीडियावर विरोधकांची खिल्ली उडविणारे संदेश  प्रसारित करून बार बार भाजप सरकारचा नारा लगावला. युतीच्या उमेदवाराने मतांची आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे वातावरण पसरले होते.
घोटी शहरात विजयोत्सव
देशभरात भाजपने मारलेल्या विजयी मुसंडीचे इगतपुरी तालुक्यात स्वागत करण्यात आले.
भाजपा तालुकाध्यक्ष अण्णा डोगरे, कैलास कस्तुरे ,शरद हांडे ,गणेश काळे ,रमेश परदेशी, बाळासाहेब सुराणा ,धर्मा अव्हाड, मयूर परदेशी आदींसह शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
निफाडला आतषबाजी
एनडीएने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर निफाडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. देशात एनडीएने बहुमत मिळवल्याने आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार विजयी झाल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास युतीचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व नागरिकांना पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ, भागवतबाबा बोरस्ते, सचिन धारराव, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक आनंद बिवलकर, संजय धारराव, अ‍ॅड. भोई, सचिन गिते, भगवान गाजरे, अशोक कुंदे, योगेश कापसे, विलास भालेराव, सार्थक गाजरे, रतन गाजरे, राहुल कांबळे, विलास वाळके, बापू कुमावत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदान झाल्यानंतर तब्बल
२५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला. टीव्हीसंचासमोर बसून भारतातील विविध मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षांची आघाडी- पिछाडी पाहून कार्यकर्ते जल्लोष करीत होते. विशेषकरून भाजपचा वाढत्या जागांवर विजय पाहून कार्यकर्ते फडाके फोडून जल्लोष करताना दिसले. निकालाचा दिवस असल्याने रहदारीने फुललेल्या डॉ. आंबेडकर चौकात शांतता होती. मेनरोडकडे जाणारा रस्त्यावरही शुकशुकाट होता. सर्व मतदार व पक्षीय कार्यकर्ते निकाल पाहण्यात दंग होते व आनंद साजरा करत होते.

Web Title: BJP's victory in the district's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.