पूर्व प्रभाग सभापतिपदी  भाजपाच्या सुमन भालेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:21 AM2018-04-22T00:21:09+5:302018-04-22T00:21:09+5:30

महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपचाच सभापती होणार हे निश्चित झाले होते. शनिवारी (दि.२१) झालेल्या प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी सुमन भालेराव याची बिनविरोध निवड झाली.

 BJP's Suman Bhalerao was elected as the East Divisional Chairman | पूर्व प्रभाग सभापतिपदी  भाजपाच्या सुमन भालेराव

पूर्व प्रभाग सभापतिपदी  भाजपाच्या सुमन भालेराव

googlenewsNext

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपचाच सभापती होणार हे निश्चित झाले होते. शनिवारी (दि.२१) झालेल्या प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी सुमन भालेराव याची बिनविरोध निवड झाली. मनपा पूर्व विभाग सभापतीची निवडणूक शनिवारी दुपारी ४ वाजता प्रभाग सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पूर्व विभागात पाच प्रभाग असून या प्रभागात १४, १५, १६, २३ व ३० यांचा समावेश आहे. या पाच प्रभागातील १९ नगरसेवकांमध्ये भाजपचे १२ राष्ट्रवादी ४ काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे नगरसेवकांमध्ये सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदींचा समावेश आहे. भाजपकडून नवीन चेहऱ्यांपैकी प्रथमेश गिते यांना उपमहापौर व श्याम बडोदे यांना स्थायी समितीवर आणि शाहीन मिर्झा यांना पूर्व प्रभाग सभापतीवर संधी देण्यात आली. दरम्यान, यावर्षी सुमन भालेराव यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी भालेराव यांची पूर्व प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी भालेराव यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title:  BJP's Suman Bhalerao was elected as the East Divisional Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.