भाजपा शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:37 AM2019-06-30T00:37:36+5:302019-06-30T00:38:12+5:30

पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व आमदारांमध्ये स्थानिक पातळीवर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेतील मरगळ व नाराजी दूर करण्यासाठी मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला

 BJP moves to change city's movements | भाजपा शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली गतिमान

भाजपा शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली गतिमान

googlenewsNext

नाशिक : पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व आमदारांमध्ये स्थानिक पातळीवर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेतील मरगळ व नाराजी दूर करण्यासाठी मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, महापालिकेचे सभागृह नेत्यापाठोपाठ आता शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाकडून या संदर्भातील नवीन अध्यक्षाची घोषणा केली जाण्याची खात्रीशीर वृत्त आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्षपदी आमदार बाळासाहेब सानप असून, महापालिका निवडणुकीपासूनच त्यांच्याविरुद्ध पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. उमेदवारी वाटप करताना सानप यांनी स्वपक्षातील अन्य आमदार व पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांचे तिकिटे कापल्याचे शल्य अजूनही अनेकांच्या मनात असून, त्याचबरोबर महापालिकेची पदे वाटप करतानाही सानप यांनी आपल्याला सोयीस्कर असलेल्या नगरसेवकांचीच वर्णी लावली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे सानप यांच्याविरुद्ध थेट जाहीरपणे आजवर नाराजी बोलून दाखविण्यात आलेली नसली तरी, अलीकडे महाजन यांच्यापासून सानप काहीसे दूर गेल्याची संधी साधून त्यांच्या विरोधकांनी डोके वर काढून ज्याप्रमाणे पक्षाला डोईजड ठरू पाहणारे महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी व्यूहरचना केली. त्याचप्रमाणे आता ‘सानप हटाव’ मोहीम सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात पक्षाच्या काही पदाधिकाºयांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्याबाबत तक्रारीही केल्याचे वृत्त आहे. सानप यांच्याविषयी पक्षात वाढत जाणारी नाराजी विधानसभा निवडणुकीत पक्षाला परवडणारी नसून, तत्पूर्वी त्यावर इलाज करण्याचा भाग म्हणून एकटे सानपच नव्हे तर अन्य काही पदाधिकारी बदलण्याचा गांभीर्याने विचार पक्षात सुरू झाला आहे. भाजपा शहराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असून, प्रत्येकाने आपल्यापरीने पक्ष श्रेष्ठींकडे फिल्ंिडग लावली आहे. दुसरीकडे सानप यांनीही पद शाबित ठेवण्यासाठी आपले राजकीय वजन वापरले आहे.
संघटनमंत्र्यांकडून चाचपणी
भाजपा शहराध्यक्ष बदलाबाबत पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महिला आघाडीच्या राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी काही पदाधिकाºयांशी चर्चा केली असून, रविवारी भाजपाचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व आघाडीच्या प्रमुखांची या निमित्ताने बैठक बोलाविण्याचीही चर्चा होऊ लागली आहे. या बैठकीत नवीन शहराध्यक्षांचे नाव निश्चित केले जाईल व तशी शिफारस प्रदेशस्तराव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  BJP moves to change city's movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.