भाजपाचे आमदार लागले कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:17 AM2018-12-13T01:17:13+5:302018-12-13T01:17:29+5:30

देशातील पाच राज्यांतील निकालामुळे भाजपाचे आमदार धास्तावले असून, प्रलंबित कामे मंजुरीचा आणि मंजूर कामांच्या भूमिपूजनाचा बार उडविण्याची तयारी सुरू झाली आहे.

 BJP MLA started work! | भाजपाचे आमदार लागले कामाला!

भाजपाचे आमदार लागले कामाला!

googlenewsNext

नाशिक : देशातील पाच राज्यांतील निकालामुळे भाजपाचेआमदार धास्तावले असून, प्रलंबित कामे मंजुरीचा आणि मंजूर कामांच्या भूमिपूजनाचा बार उडविण्याची तयारी सुरू झाली आहे.  नाशिक जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार आहेत, पैकी डॉ. राहुल अहेर हे चांदवड-देवळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तर नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार भाजपाचे आहेत. पाच राज्यांतील निकालांच्या पार्श्वभूमीवर हे आमदार कामाला लागले आहेत. यापूर्वी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात आपणच विजयी होणार असल्याचे सांगणाऱ्या आमदारांनी प्रलंबित कामे करण्यासाठी मात्र धावपळ सुरू केली आहे. नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून असताना त्यांनी आमदार निधीतील बहुतांशी कामे ना हरकत दाखल्याअभावी अडवली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ही कामे होणार असली तरी त्यासाठी समाजमंदिर आणि अन्य कोणत्याही प्रकल्पांची नंतर दुरुस्ती देखभालीची जबाबदारी महापालिकेवर येत असल्याचे निमित्त करून मुंढे यांनी पंचवटीत नाट्यगृह, गंगापूररोडवर तरण तलाव अशा अनेका कामांवर फुली मारली होती; परंतु मुंढे यांच्या बदलीमुळे हा मार्गही मोकळा झाल्याने महपालिकेकडून प्रलंबित कामांना हिरवा कंदील मिळू लागला आहे.
नाशिक शहरात राज्य शासनाच्या निधीतून पंचवटीत नाट्यगृह, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाची इमारत, काळाराम आणि कपालेश्वरचे नूतनीकरण ही कामे, तर मध्य नाशिकमध्ये महिला रुग्णालय, यशवंत व्यायामशाळा नूतनीकरण, आगर टाकळी परिसराचा विकास, आकाशवाणी केंद्राजवळ तरण तलाव या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भूमिपूजन करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समाजमंदिर, ग्रीन जिम सुरू करणे शाळांना ई लर्निंगचे साहित्य पुरविणे अशी अनेक पारंपरिक कामेदेखील वेगाने सुरू झाली आहेत.
गयारामही तयारीत...
राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अन्य पक्षातील अनेक आयाराम भाजपात आले आहेत; मात्र आता भाजपाच्या विरोधी वातावरणाचा रोख बघताच अन्य पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीतही काही जण आहेत. पूर्व नाशिक आणि मध्य नाशिकमधील असे काही इच्छुक अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे तर अपूर्व हिरे यांनी अगोदरच राष्टÑवादीत प्रवेश केला आहे.

Web Title:  BJP MLA started work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.