नोटबंदीचा निर्णय सर्वांत मोठी चूक :  यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:32 AM2018-03-31T01:32:01+5:302018-03-31T01:32:01+5:30

अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थितीत सरकारकडून आर्थिक विकासाच्या वेगाची दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महावीर व्याख्यानमालेत बोलताना केले.

The biggest mistake of the cash-for-note decision: Yashwant Sinha | नोटबंदीचा निर्णय सर्वांत मोठी चूक :  यशवंत सिन्हा

नोटबंदीचा निर्णय सर्वांत मोठी चूक :  यशवंत सिन्हा

googlenewsNext

नाशिक : अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थितीत सरकारकडून आर्थिक विकासाच्या वेगाची दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महावीर व्याख्यानमालेत बोलताना केले. नाशिक जिल्हा सांस्कृतिक कला फाउंडेशन आणि जैन सेवा कार्यसमिती यांच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प यशवंत सिन्हा यांनी ‘भारताची आर्थिक वाटचाल व दिशा’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकदादा पाटील होते. यावेळी सिन्हा यांनी स्वातंत्र्यापासून ते ९०च्या दशकापर्यंत बदलत्या अर्थव्यवस्थेचा वेध घेत पुढे सांगितले, वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे एक मॉडेल समोर ठेवले होते. त्यात सरकारी गुंतवणूक वाढविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांचा समावेश होता. त्यातून राष्टÑीय महामार्गाची निर्मिती झाली. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विस्तारले.  टेलिकॉम क्षेत्रात सुधारणा झाली. परंतु, नंतर यूपीए सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये सवलत दिली. मनरेगा सुरू केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मागणी आणि पुरवठा यांच्यात जेव्हा संतुलन राहत नाही, तेव्हा अर्थव्यवस्था विकृत होत जाते. भारताची अर्थव्यवस्था ही जटिल आहे. प्रत्येक घटकाचा विचार करावा लागणार आहे. २०१४ मध्ये जेव्हा एनडीए सरकार आले तेव्हा सुमारे २५ ते ३० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प रखडलेले होते. बॅँकांचे एनपीए वाढलेले होते. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पडलेल्या होत्या. परंतु, आता चार वर्षांत मागे वळून पाहिले तर चुकीच्या धोरणांचा अवलंब करण्यात आला. बॅँकांचा एनपीए वाढलेला आहे. सहा लाख कोटीने बचत कमी झाली आहे. गेल्या १४ वर्षांत एकही मोठा प्रकल्प उदयास आला नाही. शेतकरीवर्ग दु:खी आहे. महाराष्टÑात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या वाढते आहे. सर्वत्र नैराश्याची स्थिती आहे. भुलभुलय्या सुरू आहे. आश्वासने मात्र मोठी देताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंतही सिन्हा यांनी व्यक्त केली. सरकार स्थापन झाले त्यावेळी ‘टीम इंडिया’ची चर्चा केली गेली. परंतु, आज कुठे आहे ‘टीम इंडिया’ असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. प्रास्ताविक गौतम सुराणा यांनी केले. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, डॉ. भाऊसाहेब मोरे, सोहनलाल भंडारी, प्रवीण खाबिया आदी उपस्थित होते.
फडणवीसांवरही निशाणा
यशवंत सिन्हा यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. सिन्हा म्हणाले, मागील वर्षी अकोला येथे शेतकºयांचे आंदोलन झाले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. मुंबईत काही दिवसांपूर्वी किसान सभेचा मोर्चा आला. त्यांच्याही सर्व मागण्या मान्य केल्या. दिल्लीत अण्णा हजारे यांनी उपोषण केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मागण्या सर्व मान्य करतात; परंतु अंमलबजावणी एकाचीही झालेली नाही. अकोला येथे झालेल्या आंदोलनासंदर्भात लिखित आश्वासन देऊनही अद्याप एकही मागणी अंमलात आली नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: The biggest mistake of the cash-for-note decision: Yashwant Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.