भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:50 AM2019-04-16T00:50:52+5:302019-04-16T00:51:14+5:30

शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी डॉ़ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़

 Bhimraya, take your children's vocation ... | भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना...

भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना...

Next

नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी डॉ़ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़ तसेच शाळा, महाविद्यालयांतही तसेचनाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगर, सिडको, सातपूर परिसरातील शाळा,
महाविद्यालय, संस्था, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़
एक गाव  एक भीमजयंती
सिडको : परिसरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ अंबड ग्रामस्थांनी एक गाव एक भीमजयंती उत्सवाची परंपरा यंदाही राखली असून, यावेळी भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व पक्षांचे पदाधिकारी आपले पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून एक गाव एक भीमजयंती साजरी करण्यासाठी सहभागी झाले होते. यानिमित्त शाहीर सीमा पाटील व जॉली मोरे यांचा शिव, शाहू, फुले, आंबेडकरी शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातील मनपा शाळेसमोरील जागेवरील सुशोभित व्यासपीठावर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सायंकाळी पाथर्डी फाटा ते अंबडगाव मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक राकेश दोंदे, दिलीप दातीर, भागवत आरोटे, आमदार सीमा हिरे, शिवाजी चुंबळे, साहेबराव दातीर, महेश दातीर, सचिन मांडे, खंडू दातीर, पांडू दोंदे, बाजीराव दातीर, रवींद्र दोंदे, राजेंद्र दोंदे, बाळकृष्ण दोंदे, विष्णू फडोळ, योगेश शिंदे आदी सहभागी झाले होते.
पवननगर येथे अभिवादन
पवननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे आयोजन संतोष सोनपसारे यांनी केले होते. यावेळी आनंद सोनवणे, जयंत जाधव, डॉ़ अपूर्व हिरे, मुकेश शहाणे यांनीही भेट देऊन पुतळा पूजन केले. यावेळी प्रवीण देवरे, धनंजय भावसार, अजय घुले, राजू शहा, शशिकांत गोसावी, राजू वराडे, अतुल भामरे, बबलू सोनवणे, विशाल पगारे, रतन ढेपे, बाळा दराडे, धनाजी लगड, गणेश अरिंगळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उत्तमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. समितीचे संयोजक सुनील जगताप यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार अपूर्व हिरे, नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, शीतल भामरे, संजय भामरे, संतोष सोनपसारे, मुरली भामरे, अनिल आठवले, शबाना पठाण, मनोहर काळे, डॉ. संदीप मंडलेचा, दीपक मटाले, संदीप वाघ, पिंटू साळुंखे, मदन जमदाडे, अंकुश वºहाडे, पप्पू पाटील, मुन्ना मगर, सागर मोरे, दिनेश बोरसे आदी प्रयत्नशील होते.

Web Title:  Bhimraya, take your children's vocation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.