भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:32 AM2018-08-17T00:32:49+5:302018-08-17T00:32:55+5:30

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.

Bhima stays with project affected women | भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : पुनर्वसनाच्या प्रश्नावर आक्रमक

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.
भाम धरणाची यंदा घळभरणी करण्यात आली असून, धरणात शंभर टक्के पाणी साठले आहे. तत्पूर्वी ४८० भाम धरणग्रस्तांचे मे महिन्यात भरवज-निरपण येथे स्थलांतर व पुनर्वसन करण्यात आले. आता मात्र पाऊस सुरू असल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, धरण पूर्णपणे भरल्याने धरणाच्या खालच्या बाजूला करण्यात आलेल्या पुनर्वसनाच्या घरांमध्ये जमिनीखालून पाण्याचे झरे निघू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली, परंतु अजूनही नळांना पाणी येत नाही, त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असूनही महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. १५ आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी असंख्य महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व त्यानंतर त्यांनी पुनर्वसन कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला. काही ठिकाणी हातपंप करण्यात आले, परंतु ते नादुरुस्त आहेत. गटारींचे काम अपूर्ण असल्याने सांडपाणी वाहून जाण्याची सोय नाही. रस्तादेखील मातीचा असून, घोटी ते भरवज-निरपण हा नवीन रस्ता तयार करण्यात यावा, शेतजमिनीत बांधलेल्या घरासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांचा दारिद्र्यरेषेत समावेश करण्यात यावा, अशा मागण्या आहेत.

Web Title: Bhima stays with project affected women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.