बँकांनी मराठीत सूचना फलक लावावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:56 PM2017-11-22T23:56:59+5:302017-11-23T00:42:45+5:30

राष्टयीकृत बॅँकांनी आपले व्यवहार मराठीत करावेत, बॅँकेत मराठीतच सूचना व माहिती फलक लावावेत, अशी मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Banks should make notification boards in Marathi | बँकांनी मराठीत सूचना फलक लावावेत

बँकांनी मराठीत सूचना फलक लावावेत

Next

नाशिकरोड : राष्टयीकृत बॅँकांनी आपले व्यवहार मराठीत करावेत, बॅँकेत मराठीतच सूचना व माहिती फलक लावावेत, अशी मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत राष्टयीकृत बॅँकांना मराठीत व्यवहार करण्याबाबतचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, नाशिकरोड विभाग अध्यक्ष बंटी कोरडे यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बॅँक आॅफ इंडिया नाशिकरोड शाखेच्या व्यवस्थापक इंदिरा वैद्यनाथन व इतर राष्टÑीयीकृत बॅँकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिझर्व बॅँकेच्या परिपत्रकानुसार सर्व बॅँकांच्या शाखांनी आपले व्यवहार राजभाषेत करावेत. खिडक्यांवरील फलक, सूचना फलक, बॅँकेचे पासबुक, धनादेश काढणे, भरणा पावत्या, कर्मचाºयांचा ग्राहकांशी संवाद हे संबंधित राज्यातील राजभाषेत असावे. त्यानुसार महाराष्टÑाची राजभाषा मराठी आहे. त्यामुळे येथील सर्व बॅँकांनी मराठीत अशा सोयी-सुविधा आठ दिवसांत उपलब्ध कराव्यात अन्यथा मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.  निवेदनावर जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, साहेबराव खर्जुल, भय्या मणियार, विक्रम कदम, प्रवीण पवार, नितीन धानापुणे, सागर दाणी, उमेश भोई, रिना सोनार, धनश्री ढोले, सचिन शिसोदिया, तुषार वाडिले, विलास कदम, अशोक ठाकरे, सुनील पाटील आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Banks should make notification boards in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.