सिडको परिसरातील बँक, एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:22 AM2018-10-17T00:22:11+5:302018-10-17T00:23:11+5:30

परिसरातील बँक व एटीएममध्ये सुरक्षाव्यवस्था वाºयावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली हात की सफाई सुरू केल्याच्या घटना घडणे नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी बँकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या

 Bank of the CIDCO area, ATM security in the wind | सिडको परिसरातील बँक, एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

सिडको परिसरातील बँक, एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

googlenewsNext

सिडको : परिसरातील बँकएटीएममध्ये सुरक्षाव्यवस्था वाºयावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली हात की सफाई सुरू केल्याच्या घटना घडणे नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनीबँकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या असून, नियम ना पाळणाºया बँक व एटीएमला स्वत:ला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगत कानउघाडणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बँकांच्या शाखांना व एटीएममधून खातेधारकांना विविध प्रकारे बतावणी करून त्यांच्याकडून रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना शहरात घडत आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे गुन्हे दाखल झाल्याच्या घटनांची नोंद आहे. या घटना लक्षात घेऊन अंबड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाºया विविध बँक शाखा व एटीएमची सुरक्षता बँकांनी स्वत: घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता बँक व एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे, सुरक्षारक्षक नेमणे, सायरन लावणे, सुरक्षा फलक लावणे, स्पीकरवर ग्राहकांना सूचना देणे, अशा प्रकारच्या नियमांची पूर्तता न करणाºया व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास बँकेलाच जबाबदार धरण्यात येणार आहे. सुरक्षेसंदर्भाची महिती अंबड पोलीस स्टेशनला देण्याचे आवाहन लेखी पत्राद्वारे बँकांना कळविण्यात आले असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिले आहे.
बँकेलाच जबाबदार धरणार
बँक व एटीएममध्ये सीसीटीव्ही लावणे, सुरक्षारक्षक नेमणे, सायरन लावणे, सुरक्षा फलक लावणे, स्पीकरवर ग्राहकांना सूचना देणे अशा प्रकारच्या नियमांची पूर्तता न करणाºया व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास बँकेलाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

Web Title:  Bank of the CIDCO area, ATM security in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.