बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 07:01 PM2018-01-03T19:01:59+5:302018-01-03T19:12:46+5:30

शहरात महापालिका हद्दीमध्ये कुठल्या उपनगरीय भागात बसवर दगड फेक झाल्याची नोंद नाही; मात्र संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बंद मागे घेतला गेल्यानंतर काही समाजकंटकांनी बसस्थानकात प्रवेश करत घोषणाबाजी केली. यावेळी नाशिक-पुणे मार्गावर धावणा-या ‘शिवनेरी’ बसला समाजकंटकांनी लक्ष्य केले.

Bandala blasts in Nashik; Stoning on 'Shivshahi' standing in a new central bus stand | बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक

बंदला नाशिकमध्ये गालबोट; नवीन मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ वर दगडफेक

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक-पुणे मार्गावर धावणा-या ‘शिवशाही’ बसला समाजकंटकांनी लक्ष्य केले. चालक वाहकांच्या समुहाने धाडसाने त्या तीघा समजकंटकांना धरून ठेवले

नाशिक : शहरात सकाळपासून शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवला. चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुठेही अनुचित घटना दुपारी उशीरापर्यंत घडली नाही; मात्र दिवसाच्या तीस-या प्रहरी तीन ते चार समाजकंटकांनी नवीन मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश करुन नव्याने दाखल झालेल्या ‘शिवशाही’ बसवर (एमएच ०६ बी.डब्ल्यू ४७३) दगडफेक केली. यामुळे शांततेत सुरू असलेल्या बंदला अखेर गालबोट लागला.

सकाळी पहिल्या सत्रात मोजक्या बसेस रस्त्यावर धावत होत्या; मात्र दहा वाजेनंतर शहराच्या विविध भागांमध्ये दलिस समाजबांधव भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामंडळाकडून शहर बससेवा पुर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे दगडफेकीच्या कुठल्याही घटना दिवसभरात घडल्या नाही. शहरात महापालिका हद्दीमध्ये कुठल्या उपनगरीय भागात बसवर दगड फेक झाल्याची नोंद नाही; मात्र संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बंद मागे घेतला गेल्यानंतर काही समाजकंटकांनी बसस्थानकात प्रवेश करत घोषणाबाजी केली. यावेळी नाशिक-पुणे मार्गावर धावणा-या ‘शिवनेरी’ बसला समाजकंटकांनी लक्ष्य केले. हातातील दगड बसवर भिरकावून बसचे नुकसान केले; मात्र ज्या बसवर चालक-वाहकांचा उदरनिर्वाह होतो, त्यांना ते सहन झाले नाही, चालक वाहकांच्या समुहाने धाडसाने त्या तीघा समजकंटकांना धरून ठेवले व तातडीने पोलिसांना महिती देऊन बोलाविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणार्धात पोलीस स्थानकात पोहचले आणि तीघा समाजकंटकांना ताब्यात घेतले.

 

Web Title: Bandala blasts in Nashik; Stoning on 'Shivshahi' standing in a new central bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.