गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर बिबट मादीचा संचार पुन्हा दहशत : चांदशी ते मखमलाबाद भागात पिल्लांचाही वावर; दोन पिंजरे तैनात, वनविभागापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:44 AM2018-02-09T01:44:09+5:302018-02-09T01:44:41+5:30

नाशिक : गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याचा परिसर हा पूर्वीपासून बिबट, तरससारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ राहिला आहे.

Backbone of the Gangetic dam again spreads in the canal: Chinti to Makhmalabad areas; Deploy two cages, challenge the forest department | गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर बिबट मादीचा संचार पुन्हा दहशत : चांदशी ते मखमलाबाद भागात पिल्लांचाही वावर; दोन पिंजरे तैनात, वनविभागापुढे आव्हान

गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर बिबट मादीचा संचार पुन्हा दहशत : चांदशी ते मखमलाबाद भागात पिल्लांचाही वावर; दोन पिंजरे तैनात, वनविभागापुढे आव्हान

Next
ठळक मुद्देउसाच्या बांधाला पिंजरा लावलानियमित गस्तही सुरू

नाशिक : गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याचा परिसर हा पूर्वीपासून बिबट, तरससारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ राहिला आहे. आठवडाभरापासून पुन्हा या परिसरात बिबट मादीचा संचार वाढल्याने शेतकºयांमध्ये दहशत पसरली आहे. पिल्लांसह मादी कालव्याच्या परिसरात वावरत असून, अनेकांना तिने दर्शन दिले आहे. पंधरवड्यापासून बिबट मादीचा संचार या भागात वाढला आहे. कालव्याच्या दुतर्फा असलेली गहू, मका, उसाची शेतीमुळे या भागात लपण अधिक आहे. त्यामुळे बिबट्याचा हा परिसर नेहमीच पसंतीचा राहिला आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी हा डावा कालवा बिबट्याच्या मुक्त संचाराने थरारला होता. बिबट मादी पुन्हा या भागात सक्रिय झाल्याने नागरिक धास्तावले आहे. बिबट मादीचा आढळून आलेला वावर आणि शहराजवळची लोकवस्ती व मळे परिसर बघता वनविभागाच्या अधिकाºयांच्या पथकाने पाहणी करून संभाव्य मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी तिडके मळ्याच्या शिवारात मखमलाबाद-गंगापूर रस्त्यावर उसाच्या बांधाला पिंजरा लावला आहे. तसेच नियमित गस्तही सुरू केली आहे. बिबट मादीने अद्याप कुठल्याहीप्रकारे उपद्रव माजविला नसून नागरिकांनी संयम बाळगून खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट मादी किंवा तिच्या पिल्लांना असुरक्षितता भासेल असे कुठलेही गैरप्रकार नागरिकांनी टाळलेले दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहणार आहे. मादी आक्रमक होण्यास जास्त वेळ लागत नाही. डावा कालवा परिसरात वनविभागाकडून सावधगिरीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण मादी जेरबंद झाल्यास या भागात तिच्या असलेल्या पिल्लांचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. शहरी लोकवस्ती व मळ्यांच्या परिसरातील नागरिकांची वस्ती लक्षात घेता बिबट मादीला जेरबंद करणेही तितकेच गरजेचे असून, त्यादृष्टीने प्रयत्नही वनविभाग करत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली आहे.

Web Title: Backbone of the Gangetic dam again spreads in the canal: Chinti to Makhmalabad areas; Deploy two cages, challenge the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ