लेखाकोंडीची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:09 AM2019-04-16T01:09:01+5:302019-04-16T01:09:27+5:30

महापालिकेच्या लेखा विभागात बिले नाकारण्याबरोबरच कोणत्याही होऊ घातलेल्या कामाचे प्राकलन (इस्टिमेट) आचारसंहितेच्या नावाखाली नाकारण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

 Audit Report | लेखाकोंडीची होणार चौकशी

लेखाकोंडीची होणार चौकशी

Next

नाशिक : महापालिकेच्या लेखा विभागात बिले नाकारण्याबरोबरच कोणत्याही होऊ घातलेल्या कामाचे प्राकलन (इस्टिमेट) आचारसंहितेच्या नावाखाली नाकारण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासन उपायुक्तांना यासंदर्भात त्यांनी आदेशीत केले आहेत.
महापालिकेच्या लेखा विभागाचे कामकाज विस्कळीत झाले असून, यापूर्वी भुयारी गटार योजनेची अनेक बिले नाकारल्याने हा विभाग वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी अधीक्षक अभियंता नलावडे यांच्या विभागाकडील बिल लेखा विभागाने अडविल्याची चौकशीदेखील प्रशासनाने केली होती. आता, आता आचारसंहितेच्या नावाखाली बिलांना विलंब करणे तसेच बिल आल्यानंतर त्यावर संबंधित खात्याच्या अभियंत्याकडे परत पाठवून ठेकेदाराने सर्व शासकीय कर भरले आहे किंवा नाही यासंदर्भातील तपासणी करून टॅॅक्स इनोव्हाईसची नोंद करण्यास सांगण्यात येते. कराचा भरणा आणि अभियंत्याचा संबंध नाही. ठेकेदाराने कर भरले किंवा नाही हे विशेष काम लेखा विभागाचे आहे, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकातील कामांचे इस्टिमेट या विभागाकडे मंजुरीसाठी पाठविल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याचे सांगून ते नाकारले जाते, अशीही खातेप्रमुखांची तक्रार आहे.
खातेप्रमुखांच्या बैठकीत चर्चा
सोमवारी (दि. १५) महापालिका खाते प्रमुखांच्या साप्ताहिक बैठकीत यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विचारणा केली. त्याचबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ आणि प्रशासन उपआयुक्त तथा लेखा परीक्षक महेश बच्छाव यांना यासंदर्भात चौकशी करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.

Web Title:  Audit Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.