नायलॉन मांजाविरोधात आस एनिमेशनतर्फे ऑडीयो-विडीयोद्वारे प्रबोधन मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 02:37 PM2019-01-14T14:37:11+5:302019-01-14T14:40:11+5:30

 नायलॉन मांजाविरोधातील मोहिमेला प्रतिसाद देत आस इनोवेशनतर्फे सपकाळ कॉलेज, संदीप फाऊंडेशन, एस . व्ही .के .एम, आयएमआरडी कॉलेज ,शिरपूरच्या एमसीए आणि आईएमसीए च्या विद्यार्थ्यांसोबत एक जनजागृती मोहीम राबवत विद्यर्थ्यांना नायलाॉन मांजाच्या दुष्परीणामविषीयी ध्वनीचित्रीतिच्या माध्यमातून माहिती दिली. 

An audio-video demonstration campaign by Animation Against Nylon Manja | नायलॉन मांजाविरोधात आस एनिमेशनतर्फे ऑडीयो-विडीयोद्वारे प्रबोधन मोहिम

नायलॉन मांजाविरोधात आस एनिमेशनतर्फे ऑडीयो-विडीयोद्वारे प्रबोधन मोहिम

Next
ठळक मुद्देनायलॉन मांजाविरोधात आस एनिमेशनची जनजागृती मोहीमध्वनी चित्रफितींतून दुष्परिणांविषयी विद्यार्थ्यांची जागृती

नाशिकनायलॉन मांजाविरोधातील मोहिमेला प्रतिसाद देत आस इनोवेशनतर्फे सपकाळ कॉलेज, संदीप फाऊंडेशन, एस . व्ही .के .एम, आयएमआरडी कॉलेज ,शिरपूरच्या एमसीए आणि आईएमसीए च्या विद्यार्थ्यांसोबत एक जनजागृती मोहीम राबवत विद्यर्थ्यांना नायलाॉन मांजाच्या दुष्परीणामविषीयी ध्वनीचित्रीतिच्या माध्यमातून माहिती दिली. 

या जनजागृती मोहिमेत विविध एनिमेशन ऑडीयो-विडीयो, क्लिप बनवून शाळा-कॉलेजांमध्ये या एनिमेशन विडीयो दाखवून नायलॉन मांजाचे धोके विद्यार्थ्यांना समजवण्यात आले. जीवघेणा नायलॉन मांजा सर्वात जास्त पक्षांच्या जीवावर बेतणारा आहे. आकाशात स्वतंत्र विहार करणारे पक्षी त्याचे शिकार बनतातच, सोबतच रस्त्याने, टु-व्हीलर वर जाणारे किंवा पायी जाणार्यांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. यामुळे आजवर बरेच जीवघेणी अपघात तर झालेच आहे परंतु निष्पाप पक्ष्यांचा जीवही या जीवघेण्या मांजाने घेतला आहे. यावरच वेगळ्या पद्धतीने आणि विद्यार्थ्यांना लवकर समजेल अश्या माध्यमातून एनिमेशन विडीयोद्वारे प्रबोधन करण्याचे ठरविले आणि त्याअंतर्गत पक्षी, अपघात, मकरसंक्रात यावर संदेश देणारे विडीयो आस इनोवेशन व आयएमआरडी च्या विद्यार्थ्यांनी विकसित केले. हे विडीयो विविध शाळ-कॉलेजच्या विद्यार्थी-पालकांना दाखविण्याची मोहीम  सध्या राबवत आहे, अशी माहिती आस इनोवेशनचे आनंद शिरसाठ यांनी दिली. या पुर्ण मोहिमेसाठी त्यांना रवी तुपे, गौरव परदेशी, कोमल लोंढे, आरती दातीर, हितेश बारी, अमरीश चव्हाण, सायमीन शेख, तृप्ती बडगुजर,जयश्री डोरीक, किरण पाटील, दर्शना चौधरी यांची मदत झाल्याचेही त्यांनी सांगितिले. 

Web Title: An audio-video demonstration campaign by Animation Against Nylon Manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.