थकबाकीदार शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:38 AM2019-04-12T00:38:48+5:302019-04-12T00:39:24+5:30

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीपोटी जप्त केलेल्या शेतकºयाच्या शेतजमिनीचा गुरुवारी लिलाव करून सुमारे एक कोटी ३१ लाख रुपये वसूल केले आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, यापुढेही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करून बॅँकेची वसुली केली जाईल, असे बॅँक प्रशासनाने जाहीर केले आहे.

Auction of land for outstanding farmer | थकबाकीदार शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव

थकबाकीदार शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव

Next
ठळक मुद्देइतिहासात पहिलीच घटना

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीपोटी जप्त केलेल्या शेतकºयाच्या शेतजमिनीचा गुरुवारी लिलाव करून सुमारे एक कोटी ३१ लाख रुपये वसूल केले आहे. जिल्हा बॅँकेच्या इतिहासात ही पहिलीच घटना असून, यापुढेही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करून बॅँकेची वसुली केली जाईल, असे बॅँक प्रशासनाने जाहीर केले आहे.
नाशिक तालुक्यातील वाडगाव-गिरणारे आदिवासी संस्थेचे सभासद खंडेराव भागूजी कातड (पाटील) व इतर चौघांकडे जिल्हा बॅँकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्याने व त्यांनी कर्जवसुलीस प्रतिसाद न दिल्यामुळे काही दिवसांपूर्वी बॅँकेने त्यांच्या जमिनीवर बोझा चढवून जप्ती केली होती. सदर जागेची किंमत ठरविण्याचा प्रस्ताव सहायक निबंधकांकडे मंजुरीसाठी पाठविंला होता. त्यांनी मंजुरी दिल्यांनतर सभासदास सात दिवसांत कर्ज भरण्याची अंतिम मुदत नोटीस देण्यात आली होती. मात्र सभासदाने थकबाकी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे सदर सभासदाची नाईकवाडी शिवारातील शेतजमिनी लिलावाची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार थकबाकीदार खंडेराव भागूजी कातड यांचे नाईकवाडी येथील ३ हेक्टर ५६ आर जमिनीचा लिलाव प्रक्रिया गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सुरू करण्यात आली. याप्रक्रियेत थकबाकीदार सभासद खंडेराव भागूजी कातड हे व इच्छुक खरेदीदार संदीप थेटे, बाळासाहेब पाटील व संतोष पाटील हे सहभागी झाले.




या लिलावात संदीप थेटे यांनी १ कोटी ३० लाखांपर्यंत किमत लावली, तर बाळासाहेब पाटील यांनी एक कोटी २६ लाख ५० लाखांपर्यंत किंमत लावली व संतोष पाटील यांनी एक कोटी ३१ लाख रुपये बोली बोलली त्यानुसार सर्वाधिक बोली देणाºया संतोष पाटील यांनी रोख दोन लाख ५० हजार भरणा केला तसेच व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचा १९ लाख ६५ हजार रुपयांचा धनादेश बँकेच्या गिरणारे शाखेत जमा करून उर्वरित रक्कम ३० दिवसांच्या आत भरणा करण्याचे मान्य केले.
आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी धडक वसुली मोहीम अशीच सुरू राहणार असून, त्यानुसार नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच शीलापूर येथील माधव रामचंद्र कहांडळ यांच्याकडे दोन लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. १९९७ पासून थकबाकीदार असलेले कहांडळ यांच्या ५ एकर ११ गुंठे जागेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली असून, त्यानंतर थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या जमिनींचा कायदेशीर मार्गाने लिलाव केला जाणार असल्याचे बॅँकेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. यावेळी बँकेच्या वतीने शेती कर्जे वसुली विभागाचे व्यवस्थापक विलास बोरस्ते, प्रभाकर ढगे, शेलेश पिंगळे, नाशिक विभागीय अधिकारी धनवटे, भास्कर बोराडे, वसुली अधिकारे खुरकुटे उपस्थित होते.
(फोटो ११ आरवर बॅँक)आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी धडक वसुली मोहीम अशीच सुरू राहणार असून, त्यानुसार नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील २८ थकबाकीदारांच्या सुमारे ४० एकर क्षेत्राचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

Web Title: Auction of land for outstanding farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक