शेतमाल लिलाव आजपासून बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:38 AM2018-02-26T00:38:55+5:302018-02-26T00:38:55+5:30

बाजार समितीचा वजनकाटा सुरू करण्यासंदर्भात संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शेतमाल लिलाव सोमवारपासून (दि.२६) बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे, तर शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील निर्णय होईपर्यंत शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे.

 The auction of commodities will be closed today | शेतमाल लिलाव आजपासून बेमुदत बंद

शेतमाल लिलाव आजपासून बेमुदत बंद

Next

नांदगाव : बाजार समितीचा वजनकाटा सुरू करण्यासंदर्भात संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शेतमाल लिलाव सोमवारपासून (दि.२६) बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे, तर शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी पुढील निर्णय होईपर्यंत शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार बाजार समितीने स्वमाल-कीचा इलेक्ट्रिक वजनकाटा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. वजनकाटा सुरू करण्यापूर्वी व्यापारी वर्गाला सूचना देण्यासाठी संचालक मंडळ व व्यापारी वर्गाची बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीत शेतकºयांच्या मागणीनुसार संचालक मंडळाने वजनकाटा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावानंतर बाजार समितीच्या वजनकाट्यावर मोजलेल्या शेतमालाचे वजन व्यापारी वर्गास ग्राह्य धरावे लागेल. तसेच शेतकरी वर्ग आपल्या मर्जीनुसार बाजार समितीच्या अथवा व्यापारी वर्गाच्या वजनकाट्यावर वजन करेल अशी स्पष्ट भूमिका संचालक मंडळाने घेतली. सदर निर्णय मान्य नसल्याचे सांगत व्यापारी वर्गाने सोमवारपासून (दि. २६) लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. बाबतचा अर्ज बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे. शेतकरी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून पुढील निर्णय होईपर्यंत आपला शेतमाल विक्रीस आणू नये असे आवाहन सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने केले आहे. वजनकाट्याला विरोध म्हणजे शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण व आम आदमीचे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले यांनी केला आहे. नांदगाव बाजार समितीत वजनकाटा सुरु करण्याला विरोध करत व्यापाºयांनी बेमुदत लिलाव बंद पुकारला आहे. जे व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाही त्या व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याची मागणी आम आदमी पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी सोमवारी (दि. २६) १० वाजता मार्केटमध्ये हजर राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण, आम आदमी पार्टीचे विशाल वघघुले यांनी केले आहे.

Web Title:  The auction of commodities will be closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.