कर्जदारांच्या वाहनांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:51 AM2018-02-18T00:51:57+5:302018-02-18T00:54:23+5:30

नाशिक : जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शनिवारी सटाणा येथे घेण्यात आलेल्या वसुली आढावा बैठकीत अहेर यांनी, जिल्हा बॅँकेचे वाहन कर्ज थकविणाºयांचे वाहने जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे, तर थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढविण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी बॅँकेकडून जनावरे घेतली त्याचीही खात्री करण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, जनावरे न आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Auction of Borrowers' Vehicles | कर्जदारांच्या वाहनांचे लिलाव

कर्जदारांच्या वाहनांचे लिलाव

googlenewsNext
ठळक मुद्देकेदा अहेर : जिल्हा बॅँकेची थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीमजनावरे न आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा

नाशिक : जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शनिवारी सटाणा येथे घेण्यात आलेल्या वसुली आढावा बैठकीत अहेर यांनी, जिल्हा बॅँकेचे वाहन कर्ज थकविणाºयांचे वाहने जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे, तर थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढविण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी बॅँकेकडून जनावरे घेतली त्याचीही खात्री करण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, जनावरे न आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वीच अध्यक्ष केदा अहेर यांनी बॅँकेची थकबाकी वसुलीसाठी तालुकानिहाय मेळावे, बैठका घेण्याचे जाहीर केले होते. त्याची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली. सटाणा येथे झालेल्या बैठकीस तालुका निबंधक तसेच संचालक सचिन सावंत, सचिव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सटाणा तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा आढावा घेण्यात आला व त्यापैकी किती शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला याची माहिती सादर करण्यात आली. ज्या शेतकºयांकडे दीड लाखांहून अधिक कर्ज आहे, त्यांना दीड लाख वगळून वरची रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना केदा अहेर यांनी दिल्या. नामपूर, कळवण व देवळा या तीन विभागांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ऐपतदार व प्रभावशाली थकबाकीदारांकडून केली जात असलेली टाळाटाळ पाहता त्यांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढवून त्याचीही लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. जनावरांसाठीच्या कर्जाचाही आढावा घेण्यात आला. ज्यांनी कर्ज घेऊन जनावरे घेतली ती जनावरे आहेत की नाही याची पाहणी करून जनावरे नसतील तर कर्जदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामात सचिवांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. बॅँकेच्या कर्मचारी, अधिकाºयांनी येत्या ५० दिवसांत बॅँकेचे कर्ज वसूल करावे, असा अल्टिमेटही त्यांनी दिला.जिल्हास्तरावर जाहिरातवाहन कर्जाबाबत किती कर्जदारांनी नियमित हप्त भरले व किती थकबाकीदार आहेत याची माहिती घेऊन ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांचे वाहने जप्त करून त्याचे मूल्यांकन करून लिलाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच लिलावासाठी जिल्हास्तराव जाहिरात देऊन अधिकाधिक बोली लावली जावी, असे त्यांनी सांगिंतले.

Web Title: Auction of Borrowers' Vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक