नाशकात दुचाकींची जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 04:55 PM2019-07-19T16:55:06+5:302019-07-19T16:57:51+5:30

शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवतार पॉइंट बोरगड परिसरात गुरुवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात गुंडांनी भास्कर सोसायटीसमोरील मोकळ्या पटांगणात उभ्या केलेल्या तीन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. दुचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाशिकच्या गुंडांच्या या विकृत कृत्याचे लोन संपर्ण  राज्यभर पसरले असताना  नाशिमध्ये पुन्हा गावगुंडानी अशा प्रकारे डोके वर काढून दुचाकींची डाळपोळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

In an attempt to torment the bikes again in the Nashik | नाशकात दुचाकींची जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न

नाशकात दुचाकींची जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देम्हसरुळ परिसरात दुचाकी जवीत कांडदुचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्नअज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवतार पॉइंट बोरगड परिसरात गुरुवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात गुंडांनी भास्कर सोसायटीसमोरील मोकळ्या पटांगणात उभ्या केलेल्या तीन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. दुचाकी जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाशिकच्या गुंडांच्या या विकृत कृत्याचे लोन संपर्ण  राज्यभर पसरले असताना  नाशिमध्ये पुन्हा गावगुंडानी अशा प्रकारे डोके वर काढून दुचाकींची डाळपोळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वाढणे कॉलनी अवतार पॉईंट बोरगड परिसरात असलेल्या भास्कर सोसायटी समोर पटांगणात रितेश लाटे यांची एक्सेस क्रमांक (एमएच 15 जीटी 7491), गणेश छगन खैरनार यांची सीडी डीलक्स (एमएच 15 एफपी 8361), व रवी लाटे यांची (एमएच 15 सीसी 4952) अशा तीन गाड्या उभ्या होत्या. या तिन्ही दुचारी रात्रीच्या सुमाराला गावगुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दुचाकी जाळपोळीचे कृत्य केले आहे. 
सदरची घटना सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काही जणांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीने पेट घेतल्याने आगीने काहीकाळ रौद्ररूप धारण केले होते. दुचाकी पूर्णपणे जळाल्याने लाटे व खैरनार यांचे आर्थिक नुकसान झाले असून दुचाकींचे केवळ सांगाडे शिल्लक आहे. याबाबत अज्ञात संशयित आरोपींविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगड परिसरातील वाढणे कॉलनीत दुचाकींची जाळपोळ झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हसरुळ शिवारात व मखमलाबाद या भागात दुचाकी जाळपोळची घटना घडली होती. बोरगड येथे घडलेल्या घटनेप्रकरणी रितेश भाऊसाहेब लाटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, म्हसरूळ पोलीस निरीक्षक संजय सांगळे आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र अद्याप जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी कोणत्याही संशयिताला ताब्यात घेतलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस आर पाटील करीत आहे.

Web Title: In an attempt to torment the bikes again in the Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.