चांदवड तालुक्यात पानी फाउण्डेशनचे काम करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:54 AM2019-05-04T01:54:54+5:302019-05-04T01:55:09+5:30

चांदवड तालुक्यातील मतेवाडीजवळ (शिवाजीनगर) असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथेच गेल्या आठ वर्षांपासून राहणाºया व जमीन कसणाºया आदिवासींनी कामास विरोध करत गलूर-गोफण आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. आदिवासींनी कार्यकर्त्यांच्या गाड्यांचीही मोडतोड करत त्या पेटवून दिल्या. या हल्ल्यात सात कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Attack on villagers working in the water foundation of Chandwad taluka | चांदवड तालुक्यात पानी फाउण्डेशनचे काम करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला

चांदवड तालुक्यात पानी फाउण्डेशनचे काम करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला

Next
ठळक मुद्देगाड्यांची जाळपोळ

चांदवड : तालुक्यातील मतेवाडीजवळ (शिवाजीनगर) असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथेच गेल्या आठ वर्षांपासून राहणाºया व जमीन कसणाºया आदिवासींनी कामास विरोध करत गलूर-गोफण आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. आदिवासींनी कार्यकर्त्यांच्या गाड्यांचीही मोडतोड करत त्या पेटवून दिल्या.
या हल्ल्यात सात कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मतेवाडी शिवारात पानी फाउण्डेशनच्या वतीने चर खोदण्याचे व कुंटू बांध बांधण्याचे काम गावकऱ्यांनी सुरू केले असता सकाळी ६ वाजेच्या सुमारास संश्यितांनी कामगारांवर गलूर, गोफण व काठ्या-लाठ्याच्या साह्याने हल्ला केला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या आदिवासींनी पानी फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांच्या ८ ते ९ गाड्यांची मोडतोड करत त्या पेटवून दिल्या. तसेच जेसीबीचीदेखील तोडफोड केली. हल्ल्यात भाऊराव राघो चव्हाण, जिजाबाई भाऊराव चव्हाण, सुरेखा दगू मते, संतोष बबन मते, सागर शिवाजी कावळे आदी जखमी झाले, तर जेसीबी आॅपरेटर मोटू प्रमाद व त्याचा सहकारी मुन्ना शहा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक विशाल सनस पोहचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. मात्र अदिवासी लोक त्याच जागेवर ठिय्या मांडून बसलेले होते.
पानी फाउण्डेशनच्या स्पर्धेअंतर्गत हा हल्ला झाल्याने फाउण्डेशनच्या उपक्रमाला धक्का पोहोचला असून, स्वयंसेवकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी ५० जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Attack on villagers working in the water foundation of Chandwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.