‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:02 AM2018-02-18T00:02:59+5:302018-02-18T00:07:14+5:30

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

The attack of attackball; Baglan Tanker | ‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकर

‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकर

Next
ठळक मुद्देयेवल्याला ठेंगा जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.
परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती.
या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.
राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकरयेवल्याला ठेंगा : जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवातनाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.
परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती. या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.
राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.

Web Title: The attack of attackball; Baglan Tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.