गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:15 AM2019-02-15T01:15:56+5:302019-02-15T01:17:16+5:30

नाशिकरोड परिसरात दुपारच्या सुमारास एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या निदर्शनास आणून दिली.

The arrest of the villager | गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक

गावठी कट्टा विक्री करणाऱ्यास अटक

Next

नाशिकरोड : परिसरात दुपारच्या सुमारास एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, त्वरित गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला. संशयित इसम गावठी क ट्टा घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळून आला असता पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तेथून निसटून जाण्यास यशस्वी ठरला.
पथकाने त्याच्या दुचाकीचा पाठलाग सुरू ठेवत अखेर त्यास गाठले. त्याची अंगझडती घेतली असता पाच हजार रुपये किमतीचा लोखंडी बनावटीचा कट्टा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी संशयित रोहित सुकदेव पगारे (२३, रा. दिंडोरी) यास अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Web Title: The arrest of the villager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.