देवळाली कॅम्प : येथील भारतीय सैन्याच्या ६१ फिल्ड रेजिमेंटमध्ये शिपाई पदावर असलेले राजेश मोहन गिरी (२९) बेपत्ता झाले आहेत. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली येथील सैन्याच्या रेजिमेंटमध्ये गिरी सेवा बजावत होते. रविवारी (दि.२२) चित्रपट बघण्यासाठी जात असल्याचे सांगून ते रेजिमेंटमधून बाहेर पडले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला तसेच सैन्याच्या अधिकाºयांनी त्यांच्या राहत्या घरी बिहारमधील गोपालगंज यदोपियरा गावात कु टुंबीयांकडेही चौकशी करत विचारपूस केली; मात्र त्यांनीही नकारात्मक प्रतिसाद देत गिरी घरी व नातेवाइकांकडे नसल्याचे सांगितले. मंगळवार (दि.२४) पर्यंत सर्वत्र चौकशी करूनदेखील ते आढळून न आल्याने सुभेदार संजीव कांतालाल यांनी पोलीस ठाण्यात गिरी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास हवालदार गणपत मुठाळ करीत आहेत.