मोदींचा मान ठेवून सेना गुजरात निवडणुकीपासून दूर; फेरीवाल्यांचा प्रश्न सरकारच्या अखत्यारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:29 PM2017-10-30T15:29:26+5:302017-10-30T15:35:47+5:30

खासदार राऊत गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौºयावर आले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संपुर्ण राज्यातच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क नेत्यांना तयारीची जबाबदारी सोपविली असून, निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर झाल्या तरी, शिवसेना उमेदवारांच्या यादीसह रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Army fires Modi from Modi's election; The question of hawkers belongs to the government | मोदींचा मान ठेवून सेना गुजरात निवडणुकीपासून दूर; फेरीवाल्यांचा प्रश्न सरकारच्या अखत्यारित

मोदींचा मान ठेवून सेना गुजरात निवडणुकीपासून दूर; फेरीवाल्यांचा प्रश्न सरकारच्या अखत्यारित

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदशिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष भाजपा असेल असे राऊत यांनी ठासून सांगितले

नाशिक : गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपिच आहे, सध्याची तेथील टोकाची रणधुमाळी पाहता पंतप्रधानपदाचा मान ठेवून त्यांना अपशकून नको म्हणून शिवसेनेने गुजरातच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे एकीकडे सांगतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मात्र आपल्या साºया टिकेचा रोख भाजपावर होता. मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्न पोलीस, कायदा सुव्यवस्था व सरकारच्या अखत्यारितील असल्याचेही सांगण्यात ते विसरले नाहीत.
खासदार राऊत गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौºयावर आले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संपुर्ण राज्यातच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क नेत्यांना तयारीची जबाबदारी सोपविली असून, निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर झाल्या तरी, शिवसेना उमेदवारांच्या यादीसह रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे राऊत यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाकडूनच अधून मधून मध्यावधी निवडणुकीच्या वावड्या उठविल्या जातात अशा धमक्यांना शिवसेना कधीच घाबरली नाही व घाबरणार नाही असे सांगून, राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘मोठा भाऊ, लहान भाऊ’ बद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. कधीपासून मोठे भाऊ झाले असा सवाल करून, आमचा जन्म ५० वर्षापुर्वीच झाला असून, मोठा कोण हे जनता ओळखून असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष भाजपा असेल असे राऊत यांनी ठासून सांगितले तसेच सत्तेवर असलेला पक्षच पैशांचा निवडणुकीत वापर करतात परंतु असे करून कायम निवडणूका जिंकता येत नाही असे सांगून राऊत यांनी, भाजपा व दोन्ही कॉँग्रेस पक्ष सेनेवरच टिका करीत असल्याने या सर्वांना सेनेची भिती वाटत असून, पक्षाची सत्ता असूनही जर सामान्यांचे कामे होणार नसतील तर शिवसेना सत्ताधाºयांवर टिका करीतच राहीन अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न राजकीय नसून तो देशपातळीवर सार्वत्रिक आहे आणि सरकारनेच हा प्रश्न सोडवायचा असतो. सेनेने नेहमीच फेरीवाल्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात पोलीस यंत्रणा असल्याने महापालिकेला पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची पृष्टी जोडून अप्रत्यक्ष त्यांनी भाजपावर टिका केली.
शरद पवार व मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार इतक्या बालिशपणाचे राजकारण करणार नाही, कारण त्यांनीच महाराष्टÑाचे मुख्यमंत्री बालिश असल्याचे म्हटले आहे असे राऊत यांनी सांगितले.

Web Title: Army fires Modi from Modi's election; The question of hawkers belongs to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.