पश्चिमवर सेनेचा दावा भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:14 AM2019-07-22T01:14:55+5:302019-07-22T01:15:28+5:30

जनआशीर्वादाच्या निमित्ताने निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमागे शिवसेनेचे राजकारण लपू शकलेले नसून, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी सेनेसाठी हमखास विजय मिळवून देणा-या मतदारसंघातच जाहीरसभा घेऊन शिवसैनिकांना चेतविण्याचा प्रयत्न केला आहे.

 Army claims to be strong on the west | पश्चिमवर सेनेचा दावा भक्कम

पश्चिमवर सेनेचा दावा भक्कम

Next

नाशिक : जनआशीर्वादाच्या निमित्ताने निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमागे शिवसेनेचे राजकारण लपू शकलेले नसून, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी सेनेसाठी हमखास विजय मिळवून देणा-या मतदारसंघातच जाहीरसभा घेऊन शिवसैनिकांना चेतविण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाचा विद्यमान आमदार असतानाही ठाकरे यांनी ‘विजयी संकल्प मेळावा’ घेऊन आगामी जागावाटपाचे संकेत दिले असून, त्यानिमित्ताने सेनेचा या मतदार संघावरचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे. महाराष्टÑाच्या दौºयावर निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होऊन धुळेमार्गे तिचे नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. त्यानिमित्ताने मालेगाव बाह्य या शिवसेनेच्या सध्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. त्यापाठोपाठ ही यात्रा नांदगाव विधानसभा मतदारसंघात नेण्यात येऊन तेथेही ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. युतीच्या जागा वाटपात यापूर्वी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चांदवड मतदारसंघात या यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले, तर निफाड या सेनेच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांचे पिंपळगाव, ओझर या प्रमुख गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरात शुक्रवारी रात्री या यात्रेचे आगमन झाले.
शनिवारी मात्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली. इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदारसंघातही यापूर्वी सेनेने विजय मिळविला आहे. नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघापैकी देवळाली या एकमेव मतदारसंघात शिवसेनेचा गेल्या पाच निवडणुकीपासून वर्चस्व कायम असल्यामुळे चेहडी येथील गोदावरी लॉन्स येथे आदित्य ठाकरे यांचा विजयी संकल्प मेळावा होणे साहजिकच असले तरी, नाशिक पश्चिम या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे.
इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या
खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने हेमंत गोडसे यांना एक लाख दहा हजारांचे मताधिक्य दिले तसेच सेनेचे सर्वाधिक २१ नगरसेवक निवडून आलेले असल्याचे सांगून, अप्रत्यक्ष या मतदारसंघावर आपला हक्कच असल्याचे दाखवून दिले, तर आदित्य ठाकरे यांनीदेखील महाराष्टÑ काबीज करण्यासाठी नाशिकची सभा पश्चिम मतदारसंघातून घेत असल्याचे आवर्जून नमूद केले. सेना नेत्यांच्या या सभेने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या तर भाजपाच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.
सध्या हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून, विद्यमान आमदार पुन्हा भाजपाकडून निवडणुकीची तयारी करीत आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून शिवसेनेचे अनेक इच्छुक आहेत. त्यातही काही इच्छुकांचे मातोश्री व खासदार संजय राऊत यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे ठाकरे यांची सभा या ठिकाणी घेण्यात आल्याचे मानले जात असले तरी, ही सभा यशस्वीतेची जबाबदारी इच्छुकांवरच सोपविण्यात आली.

Web Title:  Army claims to be strong on the west

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.