मालेगावी पोलिसांचे सशस्त्र संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:01 AM2018-09-21T01:01:19+5:302018-09-21T01:02:01+5:30

आझादनगर : मालेगावी मुस्लीम बांधवांचे ताबूत विसर्जन व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहर अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विविध भागातून सायंकाळी पोलिसांचे सशस्त्र संचलन करण्यात आले.

Armed movement of Malegaon police | मालेगावी पोलिसांचे सशस्त्र संचलन

मालेगावी पोलिसांचे सशस्त्र संचलन

Next
ठळक मुद्दे मालेगावी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र संचलन करताना पोलीस दल.

आझादनगर : मालेगावी मुस्लीम बांधवांचे ताबूत विसर्जन व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहर अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विविध भागातून सायंकाळी पोलिसांचे सशस्त्र संचलन करण्यात आले.
मोहरमनिमित्त शनिवारी ताबूत विसर्जन व रविवारी गणेश विसर्जन दोन्ही उत्सव पाठोपाठ आल्याने पोलीस दलासह यंत्रणांचे विशेष लक्ष शहराकडे लागले आहे. त्यादृष्टीने पोलीस दलाकडून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. शहरात वातावरण शांत असून सद्भावना टिकून आहे. या वातावरणास गालबोट लागून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांतर्फे विशेष फबरदारी घेण्यात येत आहे. मच्छीबाजार, पेरीचौक, गूळबाजार, संगमेश्वर, मोसमपूल मार्गे समारोप करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, मसूद खान यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आदींचा सहभाग होता.
 

Web Title: Armed movement of Malegaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस