ठळक मुद्देबीकेसी उत्सवात थिरकली तरुणाईसांस्कृतिक महोत्सवात फॅशन शो ने रंगत विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार

नाशिक : सर्वत्र विविध रंगी रोषणाई, वेशभूषा, संगित, नाट्य, नृत्य, फॅशन शो, स्कीट सोबतच यावर्षी प्रेक्षकांना एरियल डॉन्सची मेजवाणी अनुभवायला मिळाली. निमित्त होते मुंबई एज्युकेशनल ट्रस्टस्टच्या भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित उत्सव 2018 या सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवात संगित व नृत्याचा पंजाबी तडका, समुहनृत्य, कव्वाली, घुमर, बाहुबली, ओल्ड मेट्रो, सिंगींग, बॉलिवूड, मायकेल जॅक्सन, ब्रेथलेस, स्कीट आदि गाणी व नृत्यावर तरुणाई थिरकली. यावेळी मेट-रत्न व प्रज्ञावंत पुरस्कारांचे वितरण संस्थेचे विश्वस्त पंकज भुजबळ, अध्यक्ष मीना भुजबळ, डॉ. जितेंद्र वाघ, दिलीप खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रामुख्याने अतुल नारंग म्हणून काम पाहिले. तर एरियल अ‍ॅक्टचे टेक्नीकल दिग्दर्शन संदीप काळे, मंगेश वायकुळे यांनी पाहिले. आशी लुथरा यांनी फॅशन शोसाठी विविध डिझाईनची वेशभूषा उपलब्ध करून दिली.अभिनेत्री फुलवा खामकर यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या बिकेसी उत्सवात त्यांनी विद्याथ्र्यांसोबत दिलखुलास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध नृत्याविष्कारही सादर केले. बीकेसी उत्सवाच्या तीन दिवसात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसात विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कलाविष्कारांचे सादरीकरण केले. यात पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, फार्मसी, मॅनेजमेंट यामधील अव्वल विद्यार्थ्यांसमवेच पी.एच.डी. प्राप्त श्वेता धोंगडे, तुषार राजपूत, हेमकांत गांगुर्डे, प्राजक्ता पानसरे, कैकशा अत्तार रौफ, महेश उखर्डे, सागर वानवे, देवेंद्र पगार डॉ. ज्योती सिंग, डॉ. मृणालीनी मधुसुदन लाड, डॉ. पंकज चव्हाण, डॉ. अभिनय निर्मल, डॉ. हरिकुमार अय्यर यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचे सर्वगुण संपन्नतेसाठी मेट-उत्सव महत्त्वाची भुमिका बजावतो म्हणून असे उत्सव होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व इन्स्टिट्युटचे प्राचार्य, संचालक,  विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, उपस्थित होते. 

बीकेसी उत्सवाच्या तीन दिवसात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसात विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कलाविष्कारांचे सादरीकरण केले.

यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वैविध्यपूर्ण वेशभूषा करून फॅशन शोमध्ये सहभाग घेतला.आशी लुथरा यांनी फॅशन शोसाठी विविध डिझाईनची वेशभूषा उपलब्ध करून दिली.

या कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रामुख्याने अतुल नारंग म्हणून काम पाहिले. तर एरियल अ‍ॅक्टचे टेक्नीकल दिग्दर्शन संदीप काळे, मंगेश वायकुळे यांनी पाहिले. आशी लुथरा यांनी फॅशन शोसाठी विविध डिझाईनची वेशभूषा उपलब्ध करून दिली.

यात पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, फार्मसी, मॅनेजमेंट यामधील अव्वल विद्यार्थ्यांसमवेच पी.एच.डी. प्राप्त श्वेता धोंगडे, तुषार राजपूत, हेमकांत गांगुर्डे, प्राजक्ता पानसरे, कैकशा अत्तार रौफ, महेश उखर्डे, सागर वानवे, देवेंद्र पगार डॉ. ज्योती सिंग, डॉ. मृणालीनी मधुसुदन लाड, डॉ. पंकज चव्हाण, डॉ. अभिनय निर्मल, डॉ. हरिकुमार अय्यर यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी मेट-रत्न व प्रज्ञावंत पुरस्कारांचे वितरण संस्थेचे विश्वस्त पंकज भुजबळ, अध्यक्ष मीना भुजबळ, डॉ. जितेंद्र वाघ, दिलीप खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे सर्वगुण संपन्नतेसाठी मेट-उत्सव महत्त्वाची भुमिका बजावतो म्हणून असे उत्सव होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व इन्स्टिट्युटचे प्राचार्य, संचालक,  विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, उपस्थित होते. 

 


Web Title: Ariel Dons' hostel experienced by audience in the BKC festival
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.