मालेगावी वाळूच्या गाड्या पळाल्या की पळविल्या? उलटसुलट चर्चा : महसूल खाते बुचकळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:11 AM2018-03-23T00:11:25+5:302018-03-23T00:11:25+5:30

नाशिक : मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेल्या दहा ट्रक पळवून नेण्याच्या घटनेवर तीन दिवसांनंतरही महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी विश्वास ठेवायला तयार नसून, मालेगावातून पळालेल्या या गाड्या जिल्ह्यातील अन्य मार्गावरील जागरूक महसूल व पोलीस खात्याच्या नजरेस पडू नये, याविषयीही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Are the miles away from Malegaavi trains running? Conversely discussion: Revenue Department in Bushal | मालेगावी वाळूच्या गाड्या पळाल्या की पळविल्या? उलटसुलट चर्चा : महसूल खाते बुचकळ्यात

मालेगावी वाळूच्या गाड्या पळाल्या की पळविल्या? उलटसुलट चर्चा : महसूल खाते बुचकळ्यात

Next
ठळक मुद्देवाहतुकीबाबत मालेगाव नेहमीच कुप्रसिद्ध महसूल खात्याने कोणताही बोध घेतलेला दिसत नाही

नाशिक : मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेल्या दहा ट्रक पळवून नेण्याच्या घटनेवर तीन दिवसांनंतरही महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी विश्वास ठेवायला तयार नसून, मालेगावातून पळालेल्या या गाड्या जिल्ह्यातील अन्य मार्गावरील जागरूक महसूल व पोलीस खात्याच्या नजरेस पडू नये, याविषयीही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव तहसीलदारांना डावलून मालेगाव तालुक्यातील हद्दीतील वाळू पकडण्यासाठी थेट देवळ्याच्या तहसीलदारांची मदत घेतल्यामुळे वाळूच्या गाड्या पळाल्या की पळविल्या याबाबत उलटसुलट चर्चा घडू लागली आहे. गौणखनिजाची चोरी व राजरोस होणाºया वाहतुकीबाबत मालेगाव नेहमीच कुप्रसिद्ध असून, त्यातून अलीकडेच गौणखनिजाच्या प्रकरणात मालेगावच्या तहसीलदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केलेली असताना त्यापासून महसूल खात्याने कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातून येणारी वाळू मालेगावमार्गेच अन्यत्र वाहून नेली जात असल्याने मालेगाव गौणखनिजाची चोरी व तस्करीचे केंद्र झाले आहे. परंतु त्यामानाने मालेगाव तहसील कार्यालयामार्फत कारवाई करताना हात आखडता घेतला जात असल्याच्या संशयावरून रविवारी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी देवळा तहसीलदार कैलास पवार यांच्या पथकाची मदत घेऊन वाळूचे दहा ट्रक जप्त करून मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या केल्या होत्या. या कारवाईदरम्यान मालेगाव तहसीलदारांना बाजूला का सारण्यात आले, याचा उलगडा होऊ शकला नसला तरी, त्याच तहसीलदारांच्या ताब्यात दिलेल्या दहा गाड्या रात्रीतून वाळू तस्करांनी पळवून नेल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. मालेगाव तहसील कार्यालयाच्या सुरक्षेसाठी कर्मचाºयांची नेमणूक नव्हती काय? एकाच वेळी दहा ट्रक पळवून नेताना कोणाच्या निदर्शनास आले नाही काय? मालेगाव तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर प्रांत अधिकाºयांचे निवासस्थान आहे, शिवाय त्याच रस्त्यावर शासकीय विश्रामगृहावर पोलिसांचा दिवस-रात्र पहारा कायम आहे. पकडलेल्या मालट्रकच्या चाव्या वाळू तस्करांकडेच देण्यामागचे कारण काय? गाड्या पकडल्या त्यावेळी त्याचे चालक, मालकांची नावे, पत्ते व त्या कोठून कोठे जात होत्या याची माहिती महसूल खात्याने घेतली नव्हती काय, असे एक नव्हे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्या आवारातून वाहने पळवून नेण्याच्या घटनेवर कार्यालय प्रमुखाने तक्रार करण्याऐवजी शिपाई व कारकुनाने पोलिसांत तक्रार अर्ज देण्याची केलेली घाईदेखील संशयास्पद असून, आता या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूणच वाळूच्या गाड्या पळून नेण्याच्या प्रश्नावर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीदेखील सूचक वक्तव्य करू लागले आहेत. असाच प्रकार नाशिक तहसील कार्यालयाच्या आवारात गेल्या महिन्यात घडला होता. त्याबाबतही निव्वळ पोलिसांत तक्रार करून महसूल खात्याने आपल्यावरील घोंगडे झटकून टाकले आहे.

Web Title: Are the miles away from Malegaavi trains running? Conversely discussion: Revenue Department in Bushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.