स्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरले सांताक्लॉज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:57 PM2017-12-25T23:57:46+5:302017-12-26T00:21:25+5:30

बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आल्याने सर्वांसाठी तो एक आदर्शच ठरला आहे.

 Antarctic Santa Claus with a message of cleanliness | स्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरले सांताक्लॉज

स्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरले सांताक्लॉज

Next

लासलगाव : बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आल्याने सर्वांसाठी तो एक आदर्शच ठरला आहे.  जे नागरिक रस्ता, पदपथावर कचरा फेकतील त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. सांताक्लॉजला भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी बच्चेकंपनी आणि मोठ्यांचीही गर्दी झाली होती. मिशन स्कूलचे प्राचार्य जोसेफ खंडागळे यांनी याविषयी सांगितले. नाताळचे औचित्य लक्षात घेऊन स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणासंबंधी सांताक्लॉजच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव प्रयोग राबवण्यात  आला असून, याबाबत सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला जोसेफ खंडागळे, एन.जे. मोहनराव, अशीत हलदार, रुबी खंडागळे, जया मेलम, सोनल केंगे, स्मिता पवार, शिल्पा कदम, सकुंतलाराव, सुनीता लाल, मथुरा मिसाळ, अशोक लाल, विश्वास साबळे, राजाराम पवार, माधुरी खाजेकर, शाळेचे पदाधिकारी शिक्षक-शिक्षिका आदी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना भेटवस्तू 
मिशन स्कूल पटांगमध्ये के. जी. ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ख्रिसमसनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत नाताळचा आनंद उत्साहात साजरा केला. या ठिकाणी सांताक्लॉज यांनी हात उंचावून व नाचून या वेळी उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नाताळच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत गिफ्टही दिले. त्यांना भेटण्यासाठी बच्चेकंपनी आतूर झाले होते. या ठिकाणी सांताक्लॉज यांनी स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आदी विषयांशी संबंधित वेगवेगळे संदेश  शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिले.

Web Title:  Antarctic Santa Claus with a message of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.