संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:51 AM2018-04-17T01:51:37+5:302018-04-17T01:51:37+5:30

लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडले

 Angry farmers stopped the work of the Manjrapada | संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले

संतप्त शेतकऱ्यांनी मांजरपाडाचे काम बंद पाडले

Next

दिंडोरी : लघुपाटबंधारे विभागाने मांजरपाडा प्रकल्पात स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने न पाळल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले असून, सोमवारी देवसाने येथे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम बंद पाडत अधिकारी आमदार, सभापती यांना घेराव घातला. आता चर्चा नको आश्वासने पूर्ण करत न्याय द्या म्हणत सर्वांना तब्बल चार तास मंदिरात कोंडले. दरम्यान चारणवाडीसह सर्व बंधाºयांचे काम सुरू करण्याचे आश्वासना मिळाल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. साठवण बंधाºयांची कामे होईपर्यंत बोगद्याचे काम बंदच ठेवण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम आहे. मांजरपाडा प्रकल्प करताना स्थानिक आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकºयांसाठी पाणी राखीव ठेवत त्यासाठी परिसरात विविध लघुबंधारे बांधण्याचे ठरले होते. नुकतेच रखडलेल्या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू झाले; मात्र त्यामुळे परिसरातील विहीर, बोअरवेलचे पाणी गेल्याने शेतकºयांनी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी प्रकल्पास भेट देत अधिकाºयांशी चर्चा केली. सात दिवसात पूर्वी ठरल्याप्रमाणे बंधाºयांची कामे सुरू करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र लघुपाटबंधारे विभागाने बोगद्याच्या कामामुळे विहिरी -बोअरवेलचे पाणी कमी झाल्याचा इन्कार करत राखीव पाणी साठ्यासाठी कामे मांजरपाडा २ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असल्याचा खुलासा केला होता. यानंतर आदिवासी प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांमध्ये अजून नाराजी वाढत शेतकºयांनी काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला. आज देवसाने येथे लघुपटबंधारे विभागाचे अभियंता संघानी हे आले असता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार झरिवाळ,स् ाभापती एकनाथ गायकवाड, अभियंता संघांनी यांच्या उपस्थितीत मारु ती मंदिरात बैठक बोलावली. आमदार झिरवाळ यांच्यासह शेतकºयांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे आहे याच मांजरपाडा प्रकल्पांतर्गत चारणवाडीसह विविध बंधाºयांची कामे सुरू करण्याची मागणी केली; मात्र अधिकारी हे फक्त शासन निर्णय वाचून दाखवत होते. आपला विश्वासघात झाल्याचे सांगत शेतकयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार, सभापतीसह अधिकाºयांना मंदिरात कोंडत प्रकल्पाचे काम बंद पाडले. यानंतर टायर जाळत निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचे वृत्त समजताच प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली तर तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकºयांशी चर्चा केली. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी जिप उपद्याक्ष प्रकाश वडजे,पस उपसभापती उत्तम जाधव विश्वासराव देशमुख,माजी पस सदस्य गोपीनाथ गांगुर्डे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांजरपाडा प्रकल्पाला येथील शेतकयांचा विरोध नाही; परंतु हा प्रकल्प होताना स्थानिक शेतकºयांना पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी परिसरात विविध लघुपाटबंधारे साठवण बंधारे बांधण्याचा निर्णय झाला होता. मात्र अधिकाºयांनी दिशाभूल करत सदर बंधाºयांची कामे सुरू न करता ते मांजरपाडा २ मध्ये समाविष्ट करण्याचे समजल्या स्थानिक जनतेचा रोष होणे साहजिकच होते. सात दिवसांपूर्वी शेतकºयांनी तसा इशारा दिला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने अधिकाºयांनी बेजबाबदार उत्तरे दिल्याने आजचा प्रसंग उदभवला. आता प्रशासनाने तातडीने सर्व कामे हाती घ्यावी व स्थानिक जनतेला न्याय द्यावा. - नरहरी झिरवाळ, आमदार

Web Title:  Angry farmers stopped the work of the Manjrapada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.